कोल्हापूर : कनाननगरमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 16:59 IST2018-07-30T16:53:54+5:302018-07-30T16:59:18+5:30
कनाननगर येथे पूर्व वैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण करून घरावर दगडफेक करून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. फिरोज रमजान सय्यद (वय २७) असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. २९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

कोल्हापूर : कनाननगरमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण
कोल्हापूर : कनाननगर येथे पूर्व वैमनस्यातून तरुणास बेदम मारहाण करून घरावर दगडफेक करून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. फिरोज रमजान सय्यद (वय २७) असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. २९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी संशयित विजय शिवाजी चव्हाण, सुरेश शिवाजी चव्हाण, काळ्या चव्हाण, आकाश चव्हाण, अजय चव्हाण, ईश्वर चव्हाण, उमेश चव्हाण (सर्व रा. विश्वशांती चौक, कनाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
फिरोज सय्यद व विजय चव्हाण यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. रविवारी रात्री या वादातून चव्हाण कुटुंबीयांनी फिरोजला काठीने बेदम मारहाण करीत, घरावर दगडफेक करीत, प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली.
या प्रकारानंतर गोंधळ उडाला. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.