कोल्हापूर : काँग्रेस रॅलीवेळी कार्यकर्त्यांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:45 IST2018-09-10T18:43:28+5:302018-09-10T18:45:13+5:30
इंधन दरवाढविरोधात सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापुरात रॅलीच्या प्रारंभीच काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. रॅली सुरू होतानाच गाडी पुढे घेण्यावरून आणि घोषणा देण्यावरून हा प्रकार पक्ष कार्यालयासमोरच घडला.

कोल्हापूर : काँग्रेस रॅलीवेळी कार्यकर्त्यांत हाणामारी
कोल्हापूर : इंधन दरवाढविरोधात सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापुरात रॅलीच्या प्रारंभीच काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. रॅली सुरू होतानाच गाडी पुढे घेण्यावरून आणि घोषणा देण्यावरून हा प्रकार पक्ष कार्यालयासमोरच घडला.
भारत बंदवेळी सकाळी शहरातील स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीसमोरून दुचाकी रॅली सुरु झाली. दरवाढी विरोधात कार्यकर्ते घोषणा सुरु होत्या. त्याचवेळी दुचाकी पुढे-मागे घेण्यावरून नगरसेवक व महापालिकेतील सभागृह नेते दिलीप पोवार यांच्या दुचाकीवरील एका सहायकाने दुसऱ्या गटातील कार्यकर्त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
अचानक सुरू झालेल्या वादावादीमुळे एकच गोंधळ उडाला. काही कार्यकर्ते व नेतेही वादावादी सुरू असलेल्या दोन कार्यकर्त्यांच्या दिशेने धावले. त्याचवेळी एका पोलिसाने आणि नगरसेवक तौफिक मुलाणी यांनी मध्यस्ती करून दोन्हीही कार्यकर्त्यांना तातडीने बाजूला घेत वाद मिटवला.