शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोल्हापूर :आकाशात रंगणार अद्भुत सोहळा, बुधवारी सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून एकाच वेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:27 IST

अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना बुधवारी अवकाशात घडून येत आहे. माघ पोर्णिमा अर्थात ३१ जानेवारी २०१८ रोजी अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी संगम एकाच वेळी घडून येईल.

ठळक मुद्देआकाशात रंगणार अद्भुत सोहळाबुधवारी सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून एकाच वेळीचंद्र नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल

कोल्हापूर : अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना बुधवारी अवकाशात घडून येत आहे. माघ पोर्णिमा अर्थात ३१ जानेवारी २०१८ रोजी अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी संगम एकाच वेळी घडून येईल.

या दिवशी चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ५८ हजार किलोमीटर अंतरावर येईल त्यामुळे नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल. हा अवकाशीय सोहळा कोल्हापूर मधून उत्तम प्रकारे दिसू शकेल.

महत्वाचे म्हणजे उघड्या डोळ्यांनी पण या घटनेचा आनंद लुटता येणार आहे. ३१ मार्च १८६६ नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल १५२ वर्षांनी असा योग जुळून येत आहे आणि आपणास या अवकाशीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्यही लाभणार आहे.हा सोहळा नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना दुर्बिणीतून पाहता यावा यासाठी राजाराम महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अविराज जत्राटकर व हौशी खगोलप्रेमी वसंत गुंडाळे यांच्या वतीने आर के नगर (खडीच्या गणपती समोरील टेकडी) कोल्हापूर येथे खास नियोजन केले आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कधी पहाल?बुधवारी ३१ तारखेला सायंकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी चंद्रोदय होईल आणि चंद्र जवळपास ९० टक्के ग्रासलेल्या स्थितीतच उगवेल. ६ वाजून ३० मिनिटांनी चंद्रबिंब पूर्णपणे ग्रासले जावून त्याचा रंग लालसर दिसेल. ही खग्रास स्थिती साधारण ७ वाजून २५ मिनिटा पर्यंत अनुभवता येईल. तिथून पुढे ग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल व ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण पूर्ण संपेल.कुठे पहाल?पूर्वेला चंद्र उगवताना.कसे पहाल?हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी सुद्धा पाहता येईल.सुपरमून म्हणजे काय?चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लाख ८४ हजार किलोमिटर इतक्या अंतरावर असतो. पण, चंद्र पृथ्वीभोवती लंबवतुर्ळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee)  जातो.

ज्यावेळी पौर्णिमेचा किंवा अमावस्येचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ अंतरावर येतो तेंव्हा त्या घटनेला सुपरमून असे म्हटले जाते. अशा स्थितीत चंद्र नेहमी पेक्षा मोठा व तेजस्वी दिसतो. वर्षातून काही वेळा सुपरमून घडून येत असते. यापूर्वीचे सुपरमून याच महिन्यात १ तारखेला झाले होते.ब्लुमून म्हणजे काय?सर्व साधारणपणे एका महिन्यात एक पोर्णिमा व एक अमावस्या असते. पण जेंव्हा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात तेंव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लुमून असे म्हटले जाते. ब्लुमूनच्या वेळी चंद्र नेहमी सारखाच असतो, त्याचा रंग निळसर वगैरे असा काही नसतो.ब्लड मून म्हणजे काय?सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात त्यावेळी ग्रहण होते. अशा वेळी जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून (Umbra) जातो तेंव्हा प्रकाश किरणांचे विकीरण होते व बहुतांश निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जावून नारंगी लाल रंग तेवढाच शिल्लक राहतो. यामुळे चंद्र गडद छायेत असताना म्हणजे खग्रास स्थितीत असताना लालसर नारंगी दिसतो.

चंद्राच्या या स्थितीला ब्लड मून असे म्हणतात. या नंतरचे खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून) २७ जुलै २०१८ रोजी होईल.बुधवारी ३१ तारखेला या तीनही गोष्टी एकाच वेळी घडून येत आहेत. त्यामुळे या घटनेला खगोलशास्त्रीय दृष्ट्या विशेष असे महत्व आहे.-प्रा. डॉ. अविराज जत्राटकर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरscienceविज्ञान