खग्रास ग्रहणात उद्या चंद्राची तीन रुपे दिसणार १५२ वर्षांनी योग : खगोल अभ्यासक मसाई पठारावर एकत्र येणार; कोल्हापूर हायकर्स यांच्याकडून विशेष दुर्बिणीची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:13 AM2018-01-30T00:13:19+5:302018-01-30T00:15:23+5:30

पन्हाळा : खग्रास ग्रहणात उद्या, बुधवारी चंद्राची तीन रुपे दिसणार आहेत. यानिमित्ताने बुधवारी सायंकाळी खगोलप्रेमी व अभ्यासक मसाई पठारावर एकत्र येणार

Yoga: Astronomers will come together on Masai Plateau after 152 years of observation of moon in three parts of the moon; Facilities for special telescopes from Kolhapur Hikers | खग्रास ग्रहणात उद्या चंद्राची तीन रुपे दिसणार १५२ वर्षांनी योग : खगोल अभ्यासक मसाई पठारावर एकत्र येणार; कोल्हापूर हायकर्स यांच्याकडून विशेष दुर्बिणीची सोय

खग्रास ग्रहणात उद्या चंद्राची तीन रुपे दिसणार १५२ वर्षांनी योग : खगोल अभ्यासक मसाई पठारावर एकत्र येणार; कोल्हापूर हायकर्स यांच्याकडून विशेष दुर्बिणीची सोय

Next
ठळक मुद्दे सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल.सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीत चंद्रोदय होईल साध्या डोळ्यांनी आपण सुपरमून, ब्लडमून, ब्ल्युमून असा तिहेरी योग पाहणार आहोत.

नितीन भगवान ।
पन्हाळा : खग्रास ग्रहणात उद्या, बुधवारी चंद्राची तीन रुपे दिसणार आहेत. यानिमित्ताने बुधवारी सायंकाळी खगोलप्रेमी व अभ्यासक मसाई पठारावर एकत्र येणार आहेत. यादिवशी होणारे खग्रास चंद्रग्रहण चंद्रबिंब, ब्लडमून, सुपरमून, ब्ल्युमून या तिहेरी स्वरुपात दिसणार आहे. याच्या अभ्यासासाठी कोल्हापूर हायकर्स यांनी विशेष दुर्बीण उपलब्ध केली असून, खगोल अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.

खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी सांगितले की, १५२ वर्षांपूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी हा तिहेरी योग आला होता. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी त्याला सुपरमून म्हणतात, पण ही संज्ञा खगोलशास्त्रीय नाही, ब्रिटिश शास्त्रज्ञ रिचर्ड नेले याने अभ्यासपूर्ण हे नाव १९७९ मध्ये ठेवले सुपरमूनवेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि.मी.वर आहे. बुधवारी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ३९ हजार कि. मी. अंतरावर येणार आहे.

१ एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या की दुसºया पौर्णिमेच्या चंद्रबिंबास ब्ल्युमून म्हणतात, पण यावेळी चंद्रबिंब निळ्या रंगाचे दिसत नाही. या महिन्यात २ जानेवारी व ३१ जानेवारी आशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. त्यामुळे येणाºया पौर्णिमेच्या चंद्रबिंबास ब्ल्यमून म्हटले आहे.

२ दरम्यान त्याच दिवशी खग्रास चंद्रग्रहण येत आहे. आपल्याकडे त्याच स्थितीत दिसणार आहे या खग्रास चंद्रग्रहणामुळे चंद्रबिंब लाल तपकिरी रंगाचे दिसेल त्याला ब्लडमुन म्हणतात म्हणजेच एकाच वेळी खगोल अभ्यासकांना ब्लडमून, सुपरमून, ब्ल्युमून असा तिहेरी चंद्रबिंब बघण्याचा योग येणार आहे.

३ याबाबत कोणीही अंधश्रद्धा पसरवू नये असेही आवाहन खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी केले आहे. यापुुढे असा तिहेरी योग २६ मे २०२१, ३१ डिसेंबर २०२८ व ३१ जानेवारी २०३७ रोजी येणार आहे.

 

Web Title: Yoga: Astronomers will come together on Masai Plateau after 152 years of observation of moon in three parts of the moon; Facilities for special telescopes from Kolhapur Hikers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.