कोल्हापूर : कॅपिंगमुळे पाच एकर जागा होणार गायब, ओला कचरा डंपीग करणार कोठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:08 IST2018-11-15T13:00:30+5:302018-11-15T13:08:58+5:30
सध्याच्या कचऱ्यावर कॅपींग केले तर कचऱ्याचे डोंगर तसेच राहणार असून पुढील काळात नवीन येणारा कचरा टाकायचा कुठे हा पश्न अधिकच गंभीर बनेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जरी हा कमी खर्चाचा प्रस्ताव वाटत असला तरी भविष्यकाळाची चिंता वाढवणारा नक्कीच आहे.

कोल्हापूर : कॅपिंगमुळे पाच एकर जागा होणार गायब, ओला कचरा डंपीग करणार कोठे?
कोल्हापूर : लाईनबाजार परिसरातील झुम प्रकल्पावर साचलेल्या तीन ते चार लाख टन कचऱ्यावर कॅपींग करण्याचा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाच्या विचाराधिन असला तरी भविष्यकाळाचा विचार करता परवडणारा नाही. सध्याच्या कचऱ्यावर कॅपींग केले तर कचऱ्याचे डोंगर तसेच राहणार असून पुढील काळात नवीन येणारा कचरा टाकायचा कुठे हा पश्न अधिकच गंभीर बनेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जरी हा कमी खर्चाचा प्रस्ताव वाटत असला तरी भविष्यकाळाची चिंता वाढवणारा नक्कीच आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शहरातील कचरा लाईनबाजार येथील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. सध्या घनकचरा व्यवस्थापनाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे दिवसे दिवस कचऱ्याचा पश्न गंभीर बनला आहे. रोज सरासरी १८० ते २०० टन कचरा लाईन बाजार परिसरात नेऊन टाकला जातो. त्यामुळे कित्तेक मिटर उंचीचे डोंगर तयार झाले आहेत.
सुमारे पाच एकर परिसरात असलेला हा कचरा डेपो आता पूर्णपणे भरलेला आहे. या कचऱ्यात खरमाती, दगडधोंडे राहिले असल्याने त्या विघटन होणे शक्य नाही. हा अविघटनशील कचरा शहरानजिकच्या खणीतून टाकण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला.परंतु त्याला विरोध होत राहिल्याने कचऱ्याचा पश्न गेल्या तीन वर्षात अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.
टोप येथील खण तसेच टाकळा येथील खण महापालिकेच्या ताब्यात आहे. लाईनबाजार येथील अविघटनशील कचरा टोप किंवा टाकळा येथील खणीत नेऊन टाकण्याचा खर्च वाढलेला आहे. मध्यंतर प्रशासनाने किती खर्च येऊ शकेल याचा अंदाज घेतला असता साधारणपणे १७ ते १८ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.
यासंदर्भात महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे वित्त आयोगातून निधी द्यावा अशी मागणी करणारा प्रस्ताव पाठविला.त्यावेळी मंत्रालयात चर्चा झाली. कचऱ्याच्या वाहतुकीवर एवढा खर्च करण्यापेक्षा आहे त्याच जागेवर कॅपींग करा, तुलनेने कमी म्हणजे ८ ते ९ कोटी रुपयांचा खर्च येऊ शकेल असा पर्याय शासकीय अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिला. त्यामुळे कॅपींगचा प्रस्ताव प्राधान्याने पुढे आला आहे.
विशिष्ट प्रावरण अंथरुण या कचऱ्यावर कॅपींग केले जाणार आहे. त्यामुळे कचरा जागेवरुन हलणार नाही. तेथेच डोंगर उभे राहणार आहेत. शिवाय ही जागा गायब होणार आहे. जर कॅपींग केले तर नव्याने येणारा कचरा टाकायचा कोठे असा प्रश्न निर्माण होणार आहे. खर्च कमी होतो