शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोल्हापूर : कचऱ्याचे ढीग हटवून बनविले विरंगुळा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 16:51 IST

स्वच्छ कोल्हापूर संकल्पनेचा निर्धार करून कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र साकारले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या विरंगुळा केंद्राचा फायदा ज्येष्ठांसह पक्ष्यांनाही होत आहे. भविष्यात येथे ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. कचऱ्यांचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रूपडेच या उपक्रमातून पालटले आहे.

ठळक मुद्देकचऱ्याचे ढीग हटवून बनविले विरंगुळा केंद्र उपक्रमातून पालटले जागेचे रूपडेच

कोल्हापूर : स्वच्छ कोल्हापूर संकल्पनेचा निर्धार करून कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र साकारले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या विरंगुळा केंद्राचा फायदा ज्येष्ठांसह पक्ष्यांनाही होत आहे. भविष्यात येथे ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. कचऱ्यांचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रूपडेच या उपक्रमातून पालटले आहे.कोल्हापूर शहरातील राजारामपुरीतील दुसऱ्या गल्लीच्या कोपऱ्यांवर हा कचऱ्यांचा कोंडाळा होता. या ठिकाणी तीन गल्लींतील कचरा, बिल्डिंग वेस्टेज येऊन पडत होते. दुर्गंधीमुळे येथून येता-जाता नाक धरून जावे लागत होते. माश्यांचा प्रादुर्भाव वाढला होता.दुर्गेश लिंग्रस यांनी सर्वप्रथम २०१० मध्ये हा कोंडाळा हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी या परिसरातील कचरा हटविण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही हातभार लावत या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावली.

आता या परिसराने बाळसे धरले आहे. आता येथे फायकस, कडुनिंब, औदुंबर, वड, सीताफळ, बोगनवेल बहरल्यामुळे या परिसराला वेगळेच रूप आले आहे. सुरुवातीला लावलेले वडाचे रोप आता १५ फूट उंच वाढून सावलीही देऊ लागले आहे.जैवविविधतेचे आकर्षणया परिसरात फुलपाखरेही बागडू लागली आहेत. पावसाळ्यात बेडकांचे हे ठिकाण ठरलेले आहे. यामुळे जैवविविधता वाढू लागली आहे. परिसरात वानरांचा उच्छाद असतो; मात्र या परिसराला चक्क त्यांनी आपल्या विश्रांतीचे ठिकाण बनवले आहे.

सकाळ-सायंकाळी फिरायला येणारे ज्येष्ठ, महाविद्यालयीन मुले, परिसरातील लहान मुले, महिला यांच्यासाठी ही जागा आता विरंगुळ्याचे केंद्र बनले असल्यामुळे या जागेचे रूपच पालटले आहे. या परिसराला हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असे नामकरण केले आहे.

परिसरातील नागरिकांनी हा परिसर विकसित करण्यात हातभार लावला आहे. उद्योगपती अजय देसाई, शीतल संघवी, विद्यानंद बेडेकर यांनी जाणीवपूर्वक हा परिसर जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी सहकार्य केले आहे. या परिसरात रात्री विद्युत रोषणाईही केली आहे. यासाठी महानगरपालिकेने मोठे सहकार्य केले आहे.- दुर्गेस लिंग्रस,शिवसेना शहरप्रमुख

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkolhapurकोल्हापूर