कोवाड कुस्ती मैदानात कोल्हापूरचा ‘उदय’
By Admin | Updated: April 23, 2015 00:57 IST2015-04-21T00:11:18+5:302015-04-23T00:57:43+5:30
शिवजयंतीचे औचित्य : बेळगुंदीच्या यशवंत सुतारवर केली मात

कोवाड कुस्ती मैदानात कोल्हापूरचा ‘उदय’
कोवाड : कोवाड (ता. चंदगड) येथील बलभीम तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात कोल्हापूर मोतीबाग तालीमचा पै. उदय पाटील याने कर्नाटक बेळगुंदीचा पै. यशवंत सुतार यांच्यावर पाचव्या मिनिटांत घुटना डावावर नेत्रदीपक विजय संपादन करून कुस्ती शौकिनांची वाहवा मिळविली.आखाड्याचे पूजन शंकर पाटील यांच्या हस्ते झाले. दुसऱ्या क्रमांकासाठी प्रदीप व बेळगावचा मल्ल अभिजित उच्चीकर यांच्या लढतीत प्रदीपने घिस्सा डावावर विजय मिळविला. आकाश घाळी (बेळगाव) व गणेश डिळेकर (कोल्हापूर) यांच्यातील लढत आकाशने जिंकली.कोवाडच्या रुपेश धर्मोजी याने राजस्थानच्या यशपालवर विजय मिळविला. पाचव्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत निट्टूरच्या नेत्रपालने खानापूरच्या उमेशला अस्मान दाखविले. या मैदानात शंभरहून अधिक लहान-मोठ्या निकाली कुस्त्या झाल्या. पंच म्हणून कल्लाप्पा चोपडे, नागोजी भोगण, विष्णू पाटील, मारुती भोगण, शिवाजी मनवाडकर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)