कोल्हापूर : कळेतील दुचाकीस्वार ठार, हॉकी स्टेडियम चौकात घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:33 IST2018-08-17T14:29:48+5:302018-08-17T14:33:15+5:30

कळे (ता. पन्हाळा) येथील दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. सद्दाम अस्लम जमादार (वय २५) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना हॉकी स्टेडियम चौकात घडली. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे.

Kolhapur: A two-wheeler killed, hockey stadium chowk attacked | कोल्हापूर : कळेतील दुचाकीस्वार ठार, हॉकी स्टेडियम चौकात घटना

कोल्हापूर : कळेतील दुचाकीस्वार ठार, हॉकी स्टेडियम चौकात घटना

ठळक मुद्देकळेतील दुचाकीस्वार ठार हॉकी स्टेडियम चौकात घटना

कोल्हापूर : कळे (ता. पन्हाळा) येथील दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. सद्दाम अस्लम जमादार (वय २५) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना हॉकी स्टेडियम चौकात घडली. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे.

याबाबतची सीपीआरमधून मिळालेली माहिती अशी की, कळे येथील सद्दाम जमादार हा गुरुवारी सायंकाळी आपल्या भावाकडे दुचाकीवरून कागल येथे निघाला होता. तो हॉकी स्टेडियम चौकातून जात असताना त्याला अज्ञात वाहनाची धडक बसली. यात तो गंभीररीत्या जखमी झाला.

घटनेनंतर नागरिकांनी सद्दामला सीपीआर रुग्णालयात आणले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच कळे येथील ग्रामस्थांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. रात्री शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळे येथे नेण्यात आला.

सद्दामचे बी. ए.पर्यंत शिक्षण झाले असून, सध्या तो राजारामपुरी येथील एका खासगी संस्थेत हार्डवेअर नेटवर्किंगचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील मासे विक्रीचे काम करतात, तर आई शेतात काम करते. जमादार कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
 

 

Web Title: Kolhapur: A two-wheeler killed, hockey stadium chowk attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.