कोल्हापूर : चोकाकजवळील अपघातातील नऊ जणांवर उपचार, एकाची प्रकृती गंभीर : १५ जणांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 17:27 IST2018-06-28T17:23:14+5:302018-06-28T17:27:47+5:30
कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस यांच्यात झालेल्या अपघातातील २४ जखमींपैकी नऊ जणांवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात गुरुवारी उपचार सुरू होते. या जखमींपैकी एकाची तब्येत गंभीर असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

कोल्हापूर : चोकाकजवळील अपघातातील नऊ जणांवर उपचार, एकाची प्रकृती गंभीर : १५ जणांना डिस्चार्ज
कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस यांच्यात झालेल्या अपघातातील २४ जखमींपैकी नऊ जणांवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात गुरुवारी उपचार सुरू होते. या जखमींपैकी एकाची तब्येत गंभीर असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी कंटेनर-स्कूल बस यांच्यात अपघात झाला. त्यामध्ये स्कूलबस चालक, कंटेनर चालक व क्लिनर हे तिघे ठार झाले तर २४ विद्यार्थी जखमी झाले. या जखमींना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेमधून शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. आतापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या घेत असलेल्या जखमींची प्रकृती स्थिर आहे पण एका जखमीची प्रकृती गंभीर आहे. या जखमीला डोक्यास गंभीर मार लागला आहे. त्याच्यावर कोणत्या पद्धतीने उपचार करायचे, यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. उपचार घेत असलेल्या जखमींना गुरुवारी सायंकाळपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला नव्हता.