शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूर : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलासह वडिलावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:24 IST

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी दौलतनगर येथील मुलासह वडिलावर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देचाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलासह वडिलावर गुन्हा दाखल

कोल्हापूर : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी दौलतनगर येथील मुलासह वडिलावर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संशयित मुलगा अरविंद महादेव वडर (वय २४ ), वडिल महादेव कल्लाप्पा वडर ( ५० , रा. दौलतनगर, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.‘ तुझे १८ वर्ष पूर्ण झाले की, तुला घरातून उचलून नेऊन माझ्या मुलाशी लग्न लावेन अशी दमदाटी वडिलांनी पीडित मुलीच्या घरात जाऊन केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक औंदुबर पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.याबाबत पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले, दीड वर्षापुर्वी महादेव वडर याने संबधित कुटूंबाकडे मुलीची मागणी आपल्या मुलासाठी केली. त्यामुळे अरविंद हा मार्च २०१७ पासून तिच्या पाठिमागे लागला.

पीडीत मुलीच्या घरी कोण नसल्याचे पाहून तिचा महाविद्यालयातील मार्गावर दूचाकीवरुन पाठलाग त्याने सुरु केला. तसेच मध्ये रस्त्यावर थांबून तिच्याबरोबर मोबाईलवर जबरदस्तीन सेल्फी काढून मारहाण केली . चाकूचा धाक दाखवून तिला दूचाकीवर बसवून रंकाळा, टेंबलाईवाडी येथे नेले. तिथे जाऊन तिला मारहाण केली.दरम्यान, त्याने स्वत:च्या घरात कोणी नसल्याचे पाहून तसेच लॉजवर नेऊन तिच्याशी अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने ती मुलगी १५ दिवस घरात शांत राहत होती. यामुळे तिच्या आईने याबाबत मुलीकडे विचारणा केली असता तिने हा प्रकार आपल्या आईसमोर कथन केला.

अखेर संबधित मुलीच्या आई सोमवारी (दि.२०) रात्री उशिरा पोलिस ठाण्यात आली. यावेळी मुलीने घडलेला प्रकार पोलिसांसमोर सांगितला. त्यानंतर संशयित अरविंद वडर व त्याचे वडिल महादेव वडर यांना पोलिसांनी अटक केली. संशयित अरविंद हा मोलमजुरी करतो तर वडिल घरी असतात. 

वडिलांना कल्पना नाही...अरविंदने केलेल्या अत्याचाराची माहिती महादेव वडर यांना  नव्हती. त्यानी घरात जाऊन दमदाटी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.अ‍ॅसिड फेकून ठार मारण्याची धमकी...संबधित अल्पवयीन मुलीने कोठे जाण्यास नकार दिला तर अरविंद हा ‘तुझ्या लहान बहिणीवर अ‍ॅसिड फेकून तिला ठार मारीन’ अशी धमकी देत व तिला दूचाकीवर बसवून विविध ठिकाणी नेत असत. त्याचबरोबर पीडीत मुलीशी वाद घालताना अरविंदला कोणी अडविले तर तो आमचा घरचा मामला आहे, असे सांगून तो दुसऱ्यांना गप्प बसवत, अशी माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर