शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : टोलचा आज फैसला

By admin | Updated: October 14, 2014 00:49 IST

अभय नेवगी : उच्च न्यायालयात अंतिम निकाल

कोल्हापूर : कोल्हापूरच्या टोलप्रश्नी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तीन याचिकांवर ३० सप्टेंबर २०१४ ला सुनावणी पूर्ण झाली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. धर्माधिकारी व ए. के. मेनन उद्या, मंगळवारी टोलबाबत अंतिम निकाल जाहीर करणार आहेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अभय नेवगी यांनी ‘लोकमत’ला दिली. दुपारी चार वाजेपर्यंत न्यायालयाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ‘टोल रद्द’च्या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे किरण पवार, चंद्रमोहन पाटील, सुभाष वाणी, शिवाजीराव परूळेकर व अमर नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने २९ व ३० सप्टेंबरला सुनावणी झाली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाच्या पहिल्या सत्रात शहर एकात्मिक रस्ते प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत. ९५ टक्के काम झालेले नाही. त्यामुळे ही बेकायदेशीर टोलवसुली रद्द करावी, रस्ते प्रकल्पात ७० टक्क्यांपेक्षा कमी कामे झाली आहेत. युटिलिटी शिफ्टिंगचा मुद्दा प्रलंबित आहे. केलेल्या रस्त्यांच्या कामाला दर्जा नाही. तोडलेली वृक्षलागवडही केलेली नाही. प्रकल्पाच्या करारातील अटी व शर्थींचा ‘आयआरबी’ने भंग केला आहे, आदी मुद्द्यांवर न्यायालयात जोरदार चर्चा झाली होती. आयआरबीला दिलेल्या भूखंडाबाबतही न्यायालयाने ताशेरे ओढले होते. महापालिकेतर्फे युटिलिटी शिफ्ंिटगबाबत प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. या सर्वांचा विचार करून न्यायालय उद्या अंतिम निकाल जाहीर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार उच्च न्यायालयात ही सुनावणी झाली आहे. आता न्यायालयाचा निर्णय अंतिम असणार आहे. या निकालाबाबत कोल्हापूरकरांत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)