कोल्हापूर : बाजार समिती प्रशासन विभागास तीन दिवस सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 16:36 IST2018-11-05T16:34:15+5:302018-11-05T16:36:37+5:30

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा प्रशासन विभागास या आठवड्यात तीन दिवस सुट्टी आहे. दीपावली सणानिमित्त समितीचे विविध विभागही बंद राहणार असल्याची माहिती समितीचे सचिव मोहन सालपे यांनी पत्रकातून दिली.

Kolhapur: Three days leave for the market committee administration department | कोल्हापूर : बाजार समिती प्रशासन विभागास तीन दिवस सुट्टी

कोल्हापूर : बाजार समिती प्रशासन विभागास तीन दिवस सुट्टी

ठळक मुद्दे बाजार समिती प्रशासन विभागास तीन दिवस सुट्टीफळ मार्केट मात्र नियमित चालू राहणार

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा प्रशासन विभागास या आठवड्यात तीन दिवस सुट्टी आहे. दीपावली सणानिमित्त समितीचे विविध विभागही बंद राहणार असल्याची माहिती समितीचे सचिव मोहन सालपे यांनी पत्रकातून दिली.

गूळ, शेंग मार्केट सोमवार ते शनिवार (दि. १०) बंद राहणार आहे; पण दीपावली पाडव्यानिमित्त गुरुवारी (दि. ८) सकाळी ७.५१ वाजता मुहूर्तावर गूळ व शेंगाचे सौदे काढण्यात येतील.

कांदा-बटाटा मार्केट उद्या बंद राहणार आहे. भाजीपाला मार्केट, तर समिती कार्यालय  उद्यापासून शुक्रवारी (दि. ९) बंद राहणार आहे. फळ मार्केट मात्र नियमित चालू राहणार आहे. याची नोंद शेतकरी, व्यापारी व ग्राहकांनी घ्यावी, असे आवाहन सचिव मोहन सालपे यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

Web Title: Kolhapur: Three days leave for the market committee administration department