शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

कोल्हापूर : किमती कपडे चोरणाऱ्या चोरट्यास अटक, साडेसहा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:59 PM

मुंबई, बंगलोर, हैदराबाद येथून ट्रॅव्हल्सच्या बसमधून येणारे प्रसिद्ध कंपन्यांचे कपडे बसचालकाला हाताशी धरून चोरणाऱ्या सराईत चोरट्यास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देकिमती कपडे चोरणाऱ्या चोरट्यास अटकसाडेसहा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : मुंबई, बंगलोर, हैदराबाद येथून ट्रॅव्हल्सच्या बसमधून येणारे प्रसिद्ध कंपन्यांचे कपडे बसचालकाला हाताशी धरून चोरणाऱ्या सराईत चोरट्यास राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी (दि. ११) अटक केली.

संशयित बादशहा इम्रान शेख (वय ३०, रा. नेहरूनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून साडेसहा लाख रुपये किमतीचे कपडे जप्त केले. त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोल्हापुरात वेगवेगळ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी येणाऱ्या कपड्यांची पोती खासगी आरामबसमधून पार्सलद्वारे येतात. या बसचालकाशी आर्थिक संगनमत करून महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात बस थांबवून पार्सलमधील काही शर्ट, पॅँटपीस काढून घेऊन ते रिक्षा, टेम्पो, कारमधून कोल्हापुरात आणून त्यांची तो खुल्या बाजारात विक्री करीत असे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून बादशहा शेख हा संशयित असे कपडे चोरून विकत होता. यामध्ये मोठी साखळी आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पाटील यांना खबऱ्यामार्फत ही माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी सायंकाळी बादशहा शेख याला अटक केली. त्याच्या नेहरूनगर येथील भाड्याच्या घराची झडती घेतली असता साडेसहा लाख रुपये किमतीचे विविध कपडे आढळून आले.

यामध्ये खासगी आराम बसचालक, क्लीनर, कपडे विक्री करणारे दुकानदार यांच्यावरही कारवाई होणार असल्याची माहिती निरीक्षक पाटील यांनी दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे, कॉन्स्टेबल प्रकाश पारधी, अमोेल अवघडे, गौरव चौगले, संजय जाधव, सिद्धेश्वर केदार, रजनीकांत कांबळे, भूषण ठाणेकर, आदींनी केली.मॉल, व्यापाऱ्याशी संपर्कसंशयित बादशहा शेख याने चोरलेले कपडे हे शहरातील मोठे मॉल आणि कापड व्यापाऱ्यांचे आहेत. बाहेरून कपडे मागविणाऱ्या मॉल, व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या आॅर्डरीमध्ये कपडे कमी पडले आहेत का, याची चौकशी सुरू आहे. बसमधून कोणी आॅर्डर मागविली होती, त्या व्यापाऱ्यांची नावे पोलीस शोधत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर