कोल्हापूर : कारखान्यांपुढे ऊस पळवापळवीचे संकट, धुराडी पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 13:06 IST2018-11-13T13:04:50+5:302018-11-13T13:06:03+5:30
ऊस दराची कोंडी फुटल्याने गळीत हंगामाने गती घेतली आहे. साखरेचे दर व एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देण्याचे आवाहन आहे. त्याचबरोबर उसाच्या पळवापळवीचे संकटही कारखान्यांसमोर राहणार आहे.

कोल्हापूर : कारखान्यांपुढे ऊस पळवापळवीचे संकट, धुराडी पेटली
कोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटल्याने गळीत हंगामाने गती घेतली आहे. साखरेचे दर व एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देण्याचे आवाहन आहे. त्याचबरोबर उसाच्या पळवापळवीचे संकटही कारखान्यांसमोर राहणार आहे.
पंधरा दिवसांनंतर ऊस दराची कोंडी फुटून हंगाम रविवारी सुरू झाला. दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. यंदा सलग तीन महिने झालेला पाऊस आणि शेवटच्या टप्प्यात पावसाने मारलेल्या दांडीमुळे उसाच्या उत्पादनात घट झाली आहे; त्यामुळे सर्वच कारखान्यांचे आपले गाळप उद्दिष्ट गाठताना दमछाक उडणार आहे. कारखान्यांची पहिल्या दिवसापासूनच एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी वाढली आहे. एकतर ऊस कमी आणि दुसरीकडे ऊस पळवापळवी असे दुहेरी संकट साखर कारखानदारांवर आले आहे.
तोडणी यंत्रांची संख्या वाढली
यंदा बहुतांशी कारखान्यांकडील ऊस तोडणी यंत्राची संख्या वाढली आहे. एका यंत्राच्या मागे आठ ते १0 ट्रॅक्टर लागतात, त्याचबरोबर दिवसाला २५० टन ऊस एक यंत्र तोडत असल्याने हंगाम गतीने पुढे सरकणार आहे.