शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : दिवाळीसाठी रेशनवरील साखर आली, दोन दिवसांत हरभरा, उडीदडाळही येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:28 IST

रेशनच्या ग्राहकांचा यंदाचा दिवाळी फराळ गोड अन् खुसखुशीत होणार आहे. जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेतील सुमारे साडेपाच लाख रेशन ग्राहकांसाठी साखर जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. उडीद व हरभरा डाळ दोन दिवसांत येणार असून, १ नोव्हेंबरपासून त्यांचे वाटप सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे दिवाळीसाठी रेशनवरील साखर आली, दोन दिवसांत हरभरा, उडीदडाळही येणार१ नोव्हेंबरपासून वाटप : लोकमत इफेक्ट

कोल्हापूर : रेशनच्या ग्राहकांचा यंदाचा दिवाळी फराळ गोड अन् खुसखुशीत होणार आहे. जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेतील सुमारे साडेपाच लाख रेशन ग्राहकांसाठी साखर जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. उडीद व हरभरा डाळ दोन दिवसांत येणार असून, १ नोव्हेंबरपासून त्यांचे वाटप सुरू होणार आहे.रेशन दुकानदारांनी विक्रीसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या संख्येत वाढ करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यासाठी वारंवार पाठपुरावाही सुरू आहे. ग्राहकांनाही या वस्तू बाजारभावापेक्षा कमी व माफक दरात मिळाव्यात व रेशन दुकानदारांनाही चार पैसे जादा मिळावेत, हा यामागील उद्देश आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने साखर, हरभराडाळ व उडीदडाळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे रेशन दुकानदारांसह ग्राहकांचीही दिवाळी गोड आणि खुसखुशीत होणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडे साखर प्राप्त झाली आहे; तर दोन दिवसांत उडीद व हरभराडाळ प्राप्त होणार आहे. प्रतिकार्ड १ किलो याप्रमाणे याचे १ नोव्हेंबरपासून वाटप होणार आहे. २० रुपये प्रतिकिलोने साखर, ३५ रुपये किलोने हरभराडाळ व ४४ रुपये किलोने उडीदडाळ शासनाने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

‘लोकमत’ इफेक्ट!‘लोकमत’मधून ‘रेशन ग्राहकांचा दिवाळीचा फराळ होणार गोड’ अशा आशयाचे वृत्त ५ आॅक्टोबरला प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार आठ दिवसांपूर्वी याबाबतचा शासन निर्णय घेतला व साखर, हरभराडाळ व उडीदडाळ प्रतिकार्ड एक किलोप्रमाणे उपलब्ध करून दिली आहे. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर