शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला; तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 10:53 IST

कोल्हापूर : जुना वाशी नाका येथे पूर्ववैमनस्यातून चौघांनी केलेल्या तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. धीरज सूरज सूर्यवंशी (वय ...

ठळक मुद्दे पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला; तरुण जखमीजुना वाशी नाका येथील घटना : वाहनांची तोडफोड : चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : जुना वाशी नाका येथे पूर्ववैमनस्यातून चौघांनी केलेल्या तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. धीरज सूरज सूर्यवंशी (वय २०) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संशयित स्वप्निल पाथरवट, ओंकार, मुनीर रिक्षावाला, कार्लोस, अभी रिक्षावाला (सर्व रा. गंजीमाळ, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.अधिक माहिती अशी, अमित पाटील आणि स्वप्निल पाथरवट यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. धीरज सूर्यवंशी हा रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपले राहते घराचे समोर फिरत असताना संशयित तलवार, काठ्या घेऊन आले. त्यांनी धीरजला अमित पाटील कुठे आहे, अशी विचारणा केली.

ते सांगण्यास नकार दिल्याने धीरजला मारहाण करत उजव्या डोळ्यावर तलवारीने वार केला तसेच सुशीला सुरेश जाधव, यांची मोपेड, सिद्धेश राजू जगताप यांच्या दुचाकीची तोडफोड करून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

संशयित हे सराईत गुन्हेगार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर