राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोल्हापूरचे जलतरणपटू अथर्व, भक्ती यांची निवड

By सचिन भोसले | Updated: October 25, 2023 12:06 IST2023-10-25T12:02:12+5:302023-10-25T12:06:37+5:30

कोल्हापूर : गोवा येथे होणाऱ्या अथर्व संकपाळ व भक्ती वाडकर या दोघा कोल्हापूकरांची निवड झाली. अथर्व २०० मीटर बटरफ्लाय ...

Kolhapur swimmers Atharva, Bhakti selected for national competition | राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोल्हापूरचे जलतरणपटू अथर्व, भक्ती यांची निवड

राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोल्हापूरचे जलतरणपटू अथर्व, भक्ती यांची निवड

कोल्हापूर : गोवा येथे होणाऱ्या अथर्व संकपाळ व भक्ती वाडकर या दोघा कोल्हापूकरांची निवड झाली.

अथर्व २०० मीटर बटरफ्लाय व ४ बाय २०० मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये निवड झाली. तर भक्ती ५० मीटर बॅक स्ट्रोक मध्ये निवड झाली. दोघेही पुणेतील बालेवाडी क्रीडाग्राममधील क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू आहेत. या दोघांचे प्रशिक्षक म्हणून बालाजी केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. 

यापुर्वीच ऑलंपियन वीरधवल खाडे, रुजुता खाडे, पृथ्वीराज डांगे यांची निवड झाली आहे. तर महाराष्ट्र जलतरण संघटनेचे सचिव व निमंत्रक राजेंद्र पालकर, जिल्हा संघटनेचे आनंद माने, राज्य संघाचे व्यवस्थापक अजय पाठक यांचे प्रोत्साहन लाभले.

Web Title: Kolhapur swimmers Atharva, Bhakti selected for national competition