कोल्हापुरात उन्हाच्या झळा तीव्र, तापमान पुन्हा ४१ डिग्रीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:01 IST2019-05-18T18:00:08+5:302019-05-18T18:01:48+5:30

कोल्हापूरचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी ४१ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. रविवारी त्यात वाढ होणार असून तापमान ४२ डिग्रीपर्यंत जाणार आहे. आगामी तीन दिवस तापमान असेच राहणार असून, साधारणत: शुक्रवारपासून तापमानात हळूहळू घट होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

In the Kolhapur summer, the temperature is severe, the temperature recovers to 41 degrees | कोल्हापुरात उन्हाच्या झळा तीव्र, तापमान पुन्हा ४१ डिग्रीपर्यंत

कोल्हापुरात उन्हाच्या झळा तीव्र, तापमान पुन्हा ४१ डिग्रीपर्यंत

ठळक मुद्देकोल्हापुरात उन्हाच्या झळा तीव्र, तापमान पुन्हा ४१ डिग्रीपर्यंतआणखी तीन दिवस तापमान चढेच राहणार : वळवाची शक्यता धूसरच

कोल्हापूर : कोल्हापूरचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी ४१ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. रविवारी त्यात वाढ होणार असून तापमान ४२ डिग्रीपर्यंत जाणार आहे. आगामी तीन दिवस तापमान असेच राहणार असून, साधारणत: शुक्रवारपासून तापमानात हळूहळू घट होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

यंदा जानेवारी, फेबु्रवारी महिन्यापासूनच कडक उन्हाच्या झळा जाणवत होत्या. मार्चपासून तर सूर्यनारायणाचा नूर काही वेगळाच राहिला. एप्रिल महिन्यात तापमान ४२ डिग्रीपर्यंत पोहोचले होेते. मध्यंतरी झालेल्या वादळाने तापमान घसरले; पण आता पुन्हा त्यात वाढ होऊ लागली आहे.

गेले दोन दिवस तापमान ४१ डिग्रीपर्यंत राहिले आहे. शनिवारी सकाळपासूनच अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दुपारी चारपर्यंत ४० डिग्री तापमान राहिले. त्यानंतर ते हळूहळू कमी होत गेले; तरी रात्री आठ वाजता ३३ डिग्री होते. त्यात किमान तापमान २४, २५ पर्यंत कायम राहिल्याने उष्मा जाणवू लागला आहे.

 

 

Web Title: In the Kolhapur summer, the temperature is severe, the temperature recovers to 41 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.