कोल्हापूर : नांदगाव येथील युवकाची मुटकेश्वर इथं आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 16:35 IST2018-06-05T16:35:01+5:302018-06-05T16:35:01+5:30

नंदगाव तालुका करवीर येथील संदीप शामराव साजणे (वय 30) याने गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर इथं झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप याने प्रापंचिक वादातून आत्महत्या केल्याचे त्याच्या खिशात मिळून आलेल्या चिठ्ठीतून उघडकीस आले आहे.

Kolhapur: Suicide in the youth of Nandgaon at Mukeshwar | कोल्हापूर : नांदगाव येथील युवकाची मुटकेश्वर इथं आत्महत्या

कोल्हापूर : नांदगाव येथील युवकाची मुटकेश्वर इथं आत्महत्या

ठळक मुद्दे नांदगाव येथील युवकाची मुटकेश्वर इथं आत्महत्याप्रापंचिक वाद, पत्नी आणि सासरे यांना जबाबदार धरा

कोल्हापूर : नंदगाव तालुका करवीर येथील संदीप शामराव साजणे (वय 30) याने गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर इथं झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप याने प्रापंचिक वादातून आत्महत्या केल्याचे त्याच्या खिशात मिळून आलेल्या चिठ्ठीतून उघडकीस आले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की संदीप साजणे हा मूळचा नंदगाव येथील रहिवासी असून त्यांने दोन महिन्यापूर्वी गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर येथील ऋतुजा पाटील हिच्याशी विवाह केला होता. मात्र प्रापंचिक वाद झाल्याने त्याने सोमवारी रात्री मुटकेश्वर येथील एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी गगनबावडा पोलीस ठाण्यात देताच पोलिसांनी मृतदेह झाडावरून खाली उतरून घेतला. तसेच मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या खिशामध्ये पोलिसांना ओळखपत्र आणि चिठ्ठी मिळून अली.

चिठ्ठीमध्ये आपण प्रापंचिक वादातून आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्या पत्नी आणि सासरे यांना जबाबदार धरावे असे नमूद केले आहे. पोलिसांनी मृतदेहाची शहानिशा करून नातेवाईकांशी संपर्क साधला. तसेच मृतदेहाचे सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला त्याच्या आई, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Kolhapur: Suicide in the youth of Nandgaon at Mukeshwar