कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आॅगस्टपासून चित्रीकरणाचे दर कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:48 PM2019-07-29T14:48:09+5:302019-07-29T14:51:35+5:30

कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरणाचे दर १ आॅगस्टपासून कमी करण्यात आले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.

In Kolhapur, the shooting rate will decrease from August to August | कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आॅगस्टपासून चित्रीकरणाचे दर कमी होणार

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आॅगस्टपासून चित्रीकरणाचे दर कमी होणार

Next
ठळक मुद्देकोल्हापूर चित्रनगरीमध्ये आॅगस्टपासून चित्रीकरणाचे दर कमी होणारमेघराज राजेभोसले यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरणाचे दर १ आॅगस्टपासून कमी करण्यात आले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये अधिकाधिक प्रमाणावर चित्रीकरणाची संख्या वाढावी. कलाकार, तंत्रज्ञांना रोजगार मिळावा, या हेतूने चित्रीकरणाचे दर कमी करावेत, याकरिता अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यास यश आले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी कोल्हापूर चित्रनगरी महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून केली जाणार आहे. तरी याचा लाभ जास्तीत जास्त निर्मात्यांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष भोसले यांनी केले आहे. याबाबतचे पत्र कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या व्यवस्थापकांनी जाहीर केले आहे.

दर असे

  • पाटीलवाडा, तळमजला - रुपये २००० ते ३००० (एकत्रित २०,०००),
  • पहिला मजला, बगीचा, प्रतीक्षालय, कार्यालय- २००० (एकत्रित १५,०००),
  • बा'देखावा- ३००० (एकत्रित १०,०००),
  • स्टुडिओ तळमजला- २००० ते ३००० (एकत्रित ८००० ते १५०००),
  • मुख्य स्टुडिओ (वातानुकूलित)- १५,०००,
  • स्टुडिओ - पहिला मजला २००० ते ५०००,
  • मुख्य प्रवेशद्वार - १५००,
  • बा' देखावा पूर्व, पश्चिम दिशा- १५००,
  • गोडावून- ५००,
  • खुली पाण्याची टाकी- १०००,
  • मंदिर व परिसर- २०००,
  • बा' रस्ता- १०००,
  • अंतर्गत रस्ते- ५००,
  • संरक्षित भिंत- १०००,
  • वाहनतळ- १५००,
  • बसथांबा- ५०००,
  • कँटीन- ५०००,
  • मोकळी जमीन (दोन एकर) - ७५००

 

Web Title: In Kolhapur, the shooting rate will decrease from August to August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.