कोल्हापूरच्या शिवसेना नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:50+5:302021-01-22T04:22:50+5:30

बेळगाव : येथील महानगरपालिकेसमोर भगवा फडकविण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे, संजय पवार यांच्या बेळगाव प्रवेशावर पोलीस खात्याने बंदी ...

Kolhapur Shiv Sena leaders barred from entering Belgaum | कोल्हापूरच्या शिवसेना नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी

कोल्हापूरच्या शिवसेना नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी

बेळगाव : येथील महानगरपालिकेसमोर भगवा फडकविण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे, संजय पवार यांच्या बेळगाव प्रवेशावर पोलीस खात्याने बंदी घातली आहे. या आशयाचे परिपत्रक वरिष्ठ जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.

बेळगाव महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला लाल - पिवळा हटविण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि तमाम मराठी भाषिकांनी केली आहे. परंतु, हा ध्वज अद्याप हटविण्यात न आल्याने गुरुवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार तत्काळ स्थगित करण्यात आला आहे. परंतु, कोल्हापूरचे विजय देवणे, संजय पवार यांनी शिनोळी फाटा येथे आंदोलन केले. कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेसमोर आज भगवा ध्वज फडकाविणारच, असा निर्धार शिवसैनिकांनी केला असून, सीमाभागात प्रवेश घेणाऱ्या विजय देवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने प्रवेशबंदी केली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांकडून प्रक्षोभक भाषण केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेळगावमधील वातावरण बिघडू शकेल आणि कोणताही अनुचित प्रकार घडू शकेल. यामुळे खबरदारी म्हणून या नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Kolhapur Shiv Sena leaders barred from entering Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.