कोल्हापूर : विक्रेत्याच्या डोक्यात फोडली बाटली, चौघा फाळकूटादादांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:30 IST2018-12-15T18:29:39+5:302018-12-15T18:30:45+5:30

वर्दळीच्या ताराबाई रोडवरील बाबूजमाल दर्ग्याजवळ पॉपकॉर्नचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून चौघा फाळकूटदादांनी विक्रेत्याच्या डोक्यात शीतपेयाची बाटली फोडून गंभीर जखमी केले.

 Kolhapur: A scam broke into the seller's head, a crime against four phalakuttadas | कोल्हापूर : विक्रेत्याच्या डोक्यात फोडली बाटली, चौघा फाळकूटादादांवर गुन्हा

कोल्हापूर : विक्रेत्याच्या डोक्यात फोडली बाटली, चौघा फाळकूटादादांवर गुन्हा

ठळक मुद्देविक्रेत्याच्या डोक्यात फोडली बाटली, ताराबाई रोडवरील प्रकार चौघा फाळकूटादादांवर गुन्हा

कोल्हापूर : वर्दळीच्या ताराबाई रोडवरील बाबूजमाल दर्ग्याजवळ पॉपकॉर्नचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून चौघा फाळकूटदादांनी विक्रेत्याच्या डोक्यात शीतपेयाची बाटली फोडून गंभीर जखमी केले.

अमर विजय सरनाईक (वय ४८, रा. अरुण सरनाईकनगर, आपटेनगर) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १४) दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी श्रीधर, राजू पाटील व अन्य दोघे अनोळखी अशा चौघा फाळकूटदादांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी, अमर सरनाईक याचा पॉपकॉर्नचा गाडा आहे. ताराबाई रोडवर बाबूजमाल दर्ग्याजवळ एका चित्रपटगृहाच्या बाहेर थांबून ते पॉपकॉर्न विक्री करतात. शुक्रवारी दुपारी श्रीधर, राजू पाटील व अन्य दोघे असे चौघे फाळकूटदादा तेथे गेले. चौघांनी चार प्लेट पॉपकॉर्न खाल्ले. पैसे न देता ते जात असताना अमर याने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी चौघांनी त्याला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.

यावेळी श्रीधर याने शीतपेयाची बाटली अमर याच्या डोक्यात फोडून गंभीर जखमी केले. हा प्रकार सुरू असताना नागरिकांनी गर्दी केली. यावेळी संशयितांनी तेथून धूम ठोकली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करीत आहेत.
 

 

Web Title:  Kolhapur: A scam broke into the seller's head, a crime against four phalakuttadas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.