शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विदयार्थ्यांच्या बॅगेतून निघाला साप, विदयार्थी- शिक्षकांची भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 16:55 IST

सातवीच्या वर्गात तास सुरु असताना विदयार्थ्यांच्या बॅगेतून साप निघाल्याने विदयार्थी व शिक्षक यांची भीतीने भंबेरी उडाली. शेवटी चौथीत शिकणाऱ्या मदारी समाजातील विदयार्थ्यांने साप पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. ही घटना आज गुरुवार दि.३० रोजी माझी शाळा भोसलेवाडी येथे सकाळी १०.३० वा.घडली.

ठळक मुद्देविदयार्थ्यांच्या बॅगेतून निघाला साप विदयार्थी- शिक्षकांची भंबेरी

कोल्हापूर:  सातवीच्या वर्गात तास सुरु असताना विदयार्थ्यांच्या बॅगेतून साप निघाल्याने विदयार्थी व शिक्षक यांची भीतीने भंबेरी उडाली. शेवटी चौथीत शिकणाऱ्या मदारी समाजातील विदयार्थ्यांने साप पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. ही घटना आज गुरुवार दि.३० रोजी माझी शाळा भोसलेवाडी येथे सकाळी १०.३० वा.घडली.विस्तृत वृत्त असे - सकाळी ‍विदयार्थी शाळेत आल्यानंतर पहिल्या तासाचे वही पुस्तक काढण्यासाठी इयत्ता सातवी ब च्या वर्गातील सर्वच विदयार्थी गडबडीत होते. याच वर्गातील सदर बाजार येथे राहणारा देवदीप अर्जुन गायकवाड यांनेही वही पुस्तक काढण्यासाठी आपल्या दप्तराची चेन उघडली असता दप्तरामध्ये चक्क साप दिसला.

घाबरलेल्या अवस्थेत या विदयार्थ्यांने वर्गशिक्षक संजय सुतार सर यांना दप्तरांत साप असल्याचे सांगितले. या सापाला पाहून वर्गांतील विदयार्थी व शिक्षक यांची भीतीने भंबेरी उडाली. वर्ग शिक्षकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून बॅगची चेन बंद केली व बॅग वर्गाबाहेर आणली.

याच शाळेत मदारी समाजाची मुले शिक्षण घेत असल्याने व त्या समाजातील मुलांना साप पकण्याची कला अवगत असल्याने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या रेहान मदारी व अदिल मदारी या विदयार्थ्यांनी बॅगेतील सापाला मोठया धैर्यांने पकडून जवळच्या शेतात सोडले. सदरचा साप दोन फुट लांबीचा होता.ज्या विदयार्थ्यांच्या दप्तरामध्ये साप आढळला त्याच्या कुटुंबाकडे चौकशी केली असता तो राहणाऱ्या परिसरातूनच तो साप त्याच्या बॅगेत आल्याचे सांगितले. यामुळे मोठा अनर्थ टळल्याने संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापिका सौ. अरुणा हुल्ले यांनी मदारी समाजातील ‍विदयार्थ्याचा सत्कार केला.

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी