शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांना उन्हाळ्यातही मिळणार मुबलक पाणी, थेट पाईपलाईन पुरवठा खंडित झाला तरी होणार पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:26 IST

अत्याधुनिक पंपसेटमुळे यंत्रणा 

कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत महानगरपालिकेने शिंगणापूर रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथील पुईखडी फिल्टर हाऊससाठी अत्याधुनिक पंपसेट बसवले आहेत. नव्या पंपसेटमुळे त्याचबरोबर नव्याने बसवण्यात येणाऱ्या आणखी दोन पंपांमुळे काळम्मावाडी योजनेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तरीही शहराचा पाणीपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवणे शक्य होणार आहे.शिंगणापूर येथे पूर्वीचे ४३५ हॉर्सपॉवरचे तीन पंपसेट जुने झाल्याने त्यांचे आयुर्मान संपले होते. त्याऐवजी आता ५४० एचपी क्षमतेचे तीन नवे पंपसेट बसवण्यात आले आहेत. अमृत योजनेतून बांधण्यात आलेल्या ११ पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटनही होत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या सलग बैठका घेतल्या. त्यामध्ये त्यांनी नागरिकांना दररोज नियमानुसार आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले पाहिजे, त्यासाठी कोणतीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले होते.आमदार सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजना पूर्ण केली. या योजनेमुळे शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल, असे वाटत असतानाच वितरणातील त्रुटी आणि पर्यायी व्यवस्थेअभावी पाणीटंचाईचा ससेमिरा कायम राहिला होता.शिंगणापूर पंपिंग स्टेशनवर तीन नवीन मोटरपंप बसवण्यात आल्यामुळे आता ए, बी व ई वॉर्डातील निम्म्या भागाला पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शिंगणापूर पंपिंग स्टेशनवरील बावडा फिल्टर हाऊससाठीही जुन्या ५४० एचपी पंपसेटऐवजी ७१० एचपी क्षमतेचा नवीन पंपसेट बसवण्यात येणार आहे. त्यामुळे ई वॉर्डातील कसबा बावड्यासह बापट कॅम्प, कदमवाडी, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी आदी भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.नव्या तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतर शहरात उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई भासणार नाही. थेट पाईपलाईनचा पुरवठा खंडित झाला तरी शिंगणापूर आणि बालिंगा पंपिंग स्टेशनवरून २४ तास अखंड पाणीपुरवठा सुरू राहील, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.बालिंगा येथे दोन नवे पंपनागदेववाडी पंपिंग स्टेशनकडील बालिंगा फिल्टर हाऊस येथेही सुधारणा करण्यात येत आहे. जुन्या २०० एचपी पंपसेटचे आयुष्य संपल्याने, तेथे नवीन २०० एचपी पंपसेट बसवण्यात येणार आहे. यामुळे बालिंगा शहराच्या सी व डी वॉर्डात नियमित पाणीपुरवठा होणार आहे. हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur to Get Ample Water Even in Summer: New Infrastructure

Web Summary : Kolhapur enhances water infrastructure with new pumps at Shinganapur and Balinga, ensuring continuous supply even if the direct pipeline fails. The upgrades address past water scarcity issues and promise uninterrupted water to various city wards, especially during summer, with project completion targeted by March 2026.