शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

कोल्हापूरकरांना ‘२०२१’पेक्षा मोठ्या महापुराची धास्ती; धरणातील पाणीसाठा दुप्पट 

By राजाराम लोंढे | Updated: June 25, 2025 18:37 IST

जूनमध्ये २४ दिवसांत सरासरी ३०० मिलीमीटर पाऊस

राजाराम लोंढेकोल्हापूर : यंदा मान्सूनपूर्व पावसाने झोडपलेच त्याचबरोबर मान्सूनने जोरदार एंट्री केल्याने गेल्या २४ दिवसांत जिल्ह्यात सरासरी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पावसाचा जोर पाहता २०२१ ची आठवण कोल्हापूरकरांना येत असून, त्यावेळी ३५० मिलीमीटर पाऊस झाला होता. मात्र, धरणातील पाणीसाठा आतापेक्षा निम्मा होता. त्यामुळे यंदा २०२१ पेक्षाही अधिक महापुराची धास्ती कोल्हापूरकरांना राहणार आहे.पावसाळा आला की, कोल्हापूरकरांच्या अंगावर काटा येतो. साधारणत: जून महिन्यात उघडझाप राहून महिन्याच्या सरासरी पेक्षा निम्मा पाऊस पडतो. पण, यंदा वरुणराजाच्या मनात काही वेगळेच दिसत आहे. जून महिन्याची सरासरी २९० मिलीमीटर आहे. महिना संपायला अजून सहा दिवस आहेत, तोपर्यंत जूनची सरासरी ओलांडून पुढे गेली आहे. मागील तीन वर्षांपेक्षा तिप्पट पाऊस आहे. २०२१ मध्ये असाच पाऊस झाला होता. त्यात धरणातील साठा त्यापेक्षा दुप्पट असल्याने कोल्हापूरकरांच्या पोटात जून महिन्यातच गोळा आला आहे.

पाटबंधारे विभागाची कसोटीजूनमधील धरणातील पाणीसाठा, आगामी तीन महिने पडणारा संभाव्य पाऊस याचा ताळमेळ घालून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. पाटबंधारे विभागाने आतापासूनच विसर्ग सुरू केला असला, तरी आगामी काळ कसोटीचा राहणार आहे.

गेल्या पाच वर्षांतील २४ जूनपर्यंतचा पाऊस, मिलीमीटरमध्येवर्ष  -  सरासरी पाऊस - पंचगंगेची पातळी फुटात२०२१ - ३५०.०  - १७.३२०२२ - ८१.७  -  ८.०५२०२३ - १५.८  -  ८.१९            २०२४ - १४१.० -  १३.५२०२५ - ३०१.२ -  २९.८            

प्रमुख धरणातील २४ जून अखेरचा पाणीसाठा, टीएमसी..धरण - २०२१ -  २०२५राधानगरी - ३.१५  - ५.२५वारणा - १८.१६  -  २०.३४दूधगंगा - ९.८१ - ८.१५कासारी - १.०५ -  १.१८कडवी - १.१२ - १.४४कुंभी - १.३६ - १.५७पाटगाव - १.७८  - २.३३घटप्रभा - १.५२  - १.५६

यावर्षी बालिंगे पुलाशेजारी टाकलेल्या भरावामुळे आरे परिसराला महापुराचा धोका अधिक आहे. त्यात, जूनपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी आतापासूनच धसका घेतला आहे. - पी. डी. पाटील (ग्रामस्थ, आरे)जून महिन्यातच पंचगंगा पात्राबाहेर पडली आहे, सध्याचा पाऊस बघता यंदा खूप वाईट अवस्था होणार आहे. प्रयाग चिखली ग्रामस्थांना सोनतळी येथे प्लॉट दिले असले तरी कुटुंबांचे विभाजन झाले आहे. त्यामुळे ४०० कुटुंबांना प्लॉटची गरज आहे. - विठ्ठल कळके (सदस्य, ग्रा. पं. प्रयाग चिखली)