शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मेगाभरतीअंतर्गत जिल्हा परिषदेत ५६६ पदांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:08 IST

राज्यभरातील ७२ हजार पदांच्या होणाऱ्या मेगाभरतीचा जिल्हानिहाय आढावा गुरुवारी राज्याचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी व्हीसीद्वारे घेतला. जिल्हा परिषदेत दुपारी झालेल्या व्हीसीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी माहिती देताना ५६६ पदांची भरतीची तयारी पूर्ण झाली असून, रोस्टर तपासणी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देमेगाभरतीअंतर्गत जिल्हा परिषदेत ५६६ पदांची भरतीप्रधान सचिवांनी व्हीसीद्वारे घेतला आढावा, रोस्टर तपासणी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : राज्यभरातील ७२ हजार पदांच्या होणाऱ्या मेगाभरतीचा जिल्हानिहाय आढावा गुरुवारी राज्याचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी व्हीसीद्वारे घेतला. जिल्हा परिषदेत दुपारी झालेल्या व्हीसीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी माहिती देताना ५६६ पदांची भरतीची तयारी पूर्ण झाली असून, रोस्टर तपासणी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले.मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर मेगा भरतीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. तातडीने सरकारने राज्यातील ३३ जिल्हा परिषदेतील रिक्त जागा व भरती होणाऱ्या जागांची सविस्तर माहिती बिंदू नामावलींसह देण्याचे आदेश दिले.

त्याचा आढावा प्रधान सचिव गुप्ता यांनी गुरुवारी दुपारी सर्व ३३ जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे संपर्क साधून घेतला. यात सहा जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांनी, सर्व माहिती भरल्याचे निदर्शनास आले. तातडीने रोस्टर तपासून घेऊन यादी अद्ययावत करा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या.कोल्हापूर जिल्हा परिषदेत या भरतीअंतर्गत ५६६ पदे भरली जाणार आहेत. यात महिला बालकल्याण, कृषी, पशूसंवर्धन, ग्रामपंचायत, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, बांधकाम, सामान्य प्रशासन या आठ विभागांतील विविध रिक्त पदांचा समावेश आहे.

पदांचा आकडा निश्चित झाला असला, तरी रोस्टरनुसार किती पदे कोणत्या आरक्षित प्रवर्गाला जाणार, याबाबत मात्र अजून माहिती तयार झालेली नाही. पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी रोस्टर अद्ययावत करून घेण्यासाठी काम करत आहेत.

हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात आॅनलाईन पद्धतीने उर्वरित माहिती भरून शासनाच्या आदेशानंतर प्रत्यक्षात भरती सुरू होणार आहे.

भरतीच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्हीसीनंतर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्या दालनात जाऊन आणखी सविस्तर माहिती घेतली. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारीच दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या दालनात गेल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

मित्तल यांची कार्यपद्धती खुलेपणाने काम करण्याची आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे काम असेल, तर कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्याकडे फाईल घेऊन या म्हणण्यापेक्षा ते स्वत:च जात असल्याने इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची मात्र भंबेरी उडत आहे. ते कधी कुठल्या ठिकाणी अचानक येतील, हे सांगता येत नसल्याने ते कार्यालयाच्या बाहेर पोर्चमध्ये जरी फिरत असले, तरी नेमके कोठे जातील याविषयी अंदाज घेताना कर्मचारी दिसत आहेत. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर