कोल्हापूर : बारा तास सलग स्ट्रेचिंग करण्याचा ‘वीर’चा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:53 IST2018-10-05T18:51:37+5:302018-10-05T18:53:26+5:30

स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधत आठ वर्षाच्या वीर सोमनाथ मगर याने सलग बारा तास ‘स्ट्रेचिंग’ करण्याचा विक्रम केला. या विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया’ मध्ये झाली.

Kolhapur: Record of 'Veer' for twelve hours continuous stretching | कोल्हापूर : बारा तास सलग स्ट्रेचिंग करण्याचा ‘वीर’चा विक्रम

कोल्हापूर : बारा तास सलग स्ट्रेचिंग करण्याचा ‘वीर’चा विक्रम

ठळक मुद्देबारा तास सलग स्ट्रेचिंग करण्याचा ‘वीर’चा विक्रमविक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया ’

कोल्हापूर : स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधत आठ वर्षाच्या वीर सोमनाथ मगर याने सलग बारा तास ‘स्ट्रेचिंग’ करण्याचा विक्रम केला. या विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया’ मध्ये झाली.

ऐतिहासिक भवानी मंडप येथे ‘वीर ’ ने या उपक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता केली. दिवसभरात त्याने दोन्ही पाय स्ट्रेचिंग करुन सलगपणे बारा तास एकाच ठिकाणी बसून काढला.

सर्वसामान्यांना काही सेकंद अशा अवस्थेत बसणे अवघड काम आहे. मात्र, कराटेचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेणाऱ्या आठ वर्षाच्या वीर ने हा उपक्रम तब्बल बारा तास बसून पुर्ण केला.

या उपक्रमाची सायंकाळी सात वाजता समाप्ती झाली. उपक्रमाचे निरीक्षण वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियातर्फे पवन सोळंकी यांनी केले. नव्या विक्रमाची नोंद झाल्यानंतर त्याला शाहू छत्रपती यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियाचे नव्या विक्रमाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.

 

Web Title: Kolhapur: Record of 'Veer' for twelve hours continuous stretching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.