शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी वळीव बरसला, तापमानाचा पारा उतरला 

By संदीप आडनाईक | Published: April 20, 2024 6:09 PM

नागरिकांची उडाली तारांबळ, हवेत गारवा

कोल्हापूर : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशीही वळीव पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पूर्व भागाला पावसाने झोडपून काढले होते. शुक्रवारी सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. दिवसभरातील उकाड्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अर्ध्या तासाहून अधिक वेळ पडलेल्या पावसाच्या सरींनी हवेत गारवा निर्माण केला.ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने काही भागात झाडांची पडझड झाली तर काही भागात रिमझिम पाऊस झाला. मागच्या काही दिवसांत पारा ३८ ते ४१ अंशापर्यंत पोहोचल्याने कोल्हापूरकर उकाड्याने हैराण होते. मात्र, शनिवारी जिल्ह्यात काही भागात वळीव पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. वादळी पावसाची हलकी सर पडून गेल्यानंतर काही वेळाने पाऊस थांबला. दरम्यान, बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची विशेषतः महिलांची धावपळ झाली. विविध तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी थोडासा दिलासा मिळाला आहे. शनिवारी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले असून, कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. दिवसभरातील तापमान सरासरी २३ अंश सेल्सिअसच्या आसपास होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस