शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

कोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पण धोका कायम, स्थलांतरास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 6:02 PM

कोल्हापूर जिल्हा आणि शहराचा पुराचा धोका कायम असून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे पाणी कोल्हापूर शहर आणि गावांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला होता.

ठळक मुद्देकोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पण धोका कायमकोल्हापूर, हातकणंगलेत स्थलांतरास सुरुवात

कोल्हापूर : जिल्हा आणि शहराचा पुराचा धोका कायम असून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे पाणी कोल्हापूर शहर आणि गावांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला होता.

सकाळी आणि संध्याकाळी ऊनही पडले होते. मात्र धरणक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार असल्याने पुन्हा पाण्याची पातळी वाढतच जाणार आहे.मंगळवारी (दि. १७) रात्रीपर्यंत शहर आणि जिल्ह्यात संततधार सुरू होती. मात्र बुधवारी सकाळी आठवड्यातून पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. संध्याकाळीही शहरात ऊन पडले होते; परंतु तरीही पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरूनच वाहत असल्याने अजूनही धोका संपलेला नाही.

जिल्ह्यातील ८४ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गगनबावड्याजवळही रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरून कोकणात जाणारी वाहतूक थंडावली आहे.जिल्ह्यातील १0 राज्यमार्ग, २४ प्रमुख जिल्हा मार्ग, १२ ग्रामीण मार्ग, १६ इतर जिल्हा मार्ग पाण्यामुळे बंद असून, त्याचा फटका एस.टी.सह खासगी वाहतुकीलाही बसला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने हातकणंगले तालुक्यातील कृष्णाकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

पुराचे पाणी गावांत शिरल्याने हातकणंगले तालुक्यातील रुई, इंगळी, कुरुंदवाड येथील २५ कुटुंबांतील ८८ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातही पंचगंगेचे पाणी घुसल्याने सुतारवाड्यातील १७ कुटुंबे सुरक्षित स्थळी हलविण्यात आली असून, मुस्लिम बोर्डिंग आणि चित्रदुर्ग मठामध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुराचा धोका वाढण्याची शक्यताएकीकडे कोयना धरणातून पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील गावांना हा धोका निर्माण झाला आहे; तर दुसरीकडे, दोन दिवसांत कोल्हापुरात ९४ टक्के भरलेल्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातील.

परिणामी पंचगंगेच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या जयंती नाल्याचे पाणी नदीत जाऊ शकत नसल्याने हेच पाणी काठावर इतरत्र पसरून शहरातील सखल भागांत आणि नाल्याच्या काठच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होणार आहे.

प्रशासन सज्जया परिस्थितीमुळे प्रशासनदेखील सज्ज झाले असून, महापालिकेने आणि प्रशासनाने २४ तास आपली पथके तैनात केली आहेत. रत्नागिरीकडे जाणारा शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तेथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर