शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव तयार

By admin | Updated: July 11, 2015 00:09 IST

महापालिकेची माहिती : राज्य शासनाच्या सूचनेनुसार होणार सादर

कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’ योजनेत १५ निकषांद्वारे गुणपद्धतीने वर्गीकरण करून शहरांची निवड होणार आहे. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या गुणपत्रिकेनुसार ‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. राज्य शासनाच्या सूचनेनंतर प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शुक्रवारी दिली.महापालिकेने पाठविलेल्या निकषांची राज्य शासन त्रयस्थपणे पडताळणी करणार आहे. निकषांची पडताळणी व प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्या-त्या शहरांना त्या निकषांवर वस्तुस्थिती पाहून गुण दिले जाणार आहेत.मनपाची स्मार्टसिटीची तयारी आॅनलाईन तक्रार निवारणएक आठवड्यात महापालिका आॅनलाईन तक्र ार निवारण सुविधा सुरू केली जाणार आहे. शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थामहापालिका के.एम.टी.द्वारे सक्षम व्यवस्था पुरविते. पार्किंग व्यवस्थेसाठी लवकरच बहुमजली पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे.ई-गव्हर्नन्स व लोकसहभागमहापालिका संकेतस्थळावरून माहिती प्रसिद्ध करत असते. ‘वेध-कोल्हापूर’ या ई-पत्रिकेद्वारे नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. गरिबांना परवडणारी घरेअकरा इमारतींसाठी असलेल्या निकषांत बसणाऱ्या झोपडपट्टीच्या ठिकाणी बहुमजली इमारती उभारण्याचे नियोजन महापालिका करणार आहे.पाणीपुरवठाबहुतांश भागांत मुबलक पाणीपुरवठा होत नसला तरी इतर शहरांच्या मानाने स्थिती चांगली आहे. वीज व्यवस्थाशहरात महापालिकेतर्फे वीजपुरवठा होत नाही. मात्र, रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांची सद्य:स्थिती दर्शविण्यात येईल.कचरा उठावकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. नागरिंकांना कचरा उठाव व निर्गत, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण,आदींबाबतचे नियोजन कळविण्यात येणार आहे.वैयक्तिक शौचालयमहापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील एक लाख ४० हजार घरांचा सर्व्हे करण्यात आला. शहरात किमान १५ हजार घरांमध्ये वैयक्तिक शौचालय नसल्याने पुढे आले. या निकषासाठी महापालिकेला दहापैकी किमान आठ गुण मिळण्याची आशा आहे.