शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

Kolhapur- पोलिसांनी वेशांतर करून सराईत चोरट्या महिलेस केली अटक, दोन गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 14:18 IST

कोल्हापूर : शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वेशांतर करून सराईत चोरट्या महिलेस पकडले. अनघा अनंत जोशी (वय ६२, मूळ ...

कोल्हापूर : शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वेशांतर करून सराईत चोरट्या महिलेस पकडले. अनघा अनंत जोशी (वय ६२, मूळ रा. शिवाजीनगर, रत्नागिरी, सध्या रा. जाधववाडी, कोल्हापूर) असे अटकेतील महिलेचे नाव आहे. तिच्याकडून कोल्हापूर बसस्थानक आणि कराड बसस्थानकातील चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली.पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात १ मे २०२३ रोजी वैशाली यल्लाप्पा कोटगी (सध्या रा. रोहा, जि. रायगड, मूळ रा. गडहिंग्लज) या महिलेच्या गळ्यातील सव्वा तोळे सोन्याची चेन चोरट्याने लंपास केली होती. तो गुन्हा सराईत चोरटी महिला अनघा जोशी हिने केल्याची माहिती कॉन्स्टेबल मिलिंद बांगर, शुभम संकपाळ आणि लखनसिंह पाटील यांना मिळाली. १ जुलैच्या दुपारी ती मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याचे समजताच उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्यासह पथकाने वेशांतर करून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा रचून जोशी हिला अटक केली.अधिक चौकशीत तिच्याकडून कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील चेन चोरीसह कराड बसस्थानकातून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचा गुन्हा उघड झाला. पोलिसांनी तिच्याकडून सोन्याची चेन आणि माळ असा सुमारे अडीच तोळ्यांचा दोन लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आठ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर तिचा ताबा कराड पोलिसांकडे देण्यात आला.तीन जिल्ह्यात गुन्हेकोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात दहा ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीचे गुन्हे तिने केले आहेत. सांगली शहरातील गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना तिच्या रत्नागिरीतील घरात साडेसहा लाखांचे दागिने व रोकड मिळाली होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस