शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोल्हापूर : ....अन्यथा तीव्र आंदोलन, सेट- नेट, पीएच.डी., पदवीधारक आणि प्राध्यापकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 11:25 IST

महाराष्ट्रातील सर्व अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठांतील सहायक प्राध्यापक पदांची भरती सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर प्राध्यापकांनी ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्दे ....अन्यथा तीव्र आंदोलन, एकदिवसीय धरणे आंदोलनसेट- नेट, पीएच.डी., पदवीधारक आणि प्राध्यापकांचा इशारा

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्व अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठांतील सहायक प्राध्यापक पदांची भरती सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर प्राध्यापकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा शेतकरी बांधवांप्रमाणे प्राध्यापकांवरही आत्महत्येचे दिवस येतील. पंधरा दिवसांत ठोस निर्णय घ्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल; त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्रातील सेट-नेट, पीएच. डी. पदवीधारक आणि प्राध्यापकांनी दिला.महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठांतील सहायक प्राध्यापकपदांच्या भरतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यातील सहायक प्राध्यापक पदांच्या हजारो जागा रिक्त पडल्या असून, उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील उच्च शिक्षणावर होत आहे.

सहायक प्राध्यापक पदभरती बंदीमुळे राज्यातील सेट-नेट पात्रता आणि पीएच. डी. पदवीधारकांच्या बेरोजगारीमध्येही वाढ झालीय. त्यांना कोणत्याही प्रकारचे उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक जीवन अस्थिर बनले आहे. याला शासन जबाबदार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठांतील सहायक प्राध्यापक पदांची भरती सुरू करावी, यासाठी कोल्हापूर विभाग उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षण सहसंचालक कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात किशोर खिलारे, संतोष भोसले, अभिजित पवार, शंकर जिरगे यांच्यासह प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागण्या

  1. - राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठांतील सहायक प्राध्यापक पदभरतीची बंदी त्वरीत रद्द करा
  2. - तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरावा.
  3. - सर्व अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त जागा पूर्णकालीन व कायमस्वरूपी भरण्यात याव्यात.
  4. - वाढती विद्यार्थिसंख्या पाहून विनाअनुदानित तुकड्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे.
  5. - सर्व अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त जागा पूर्णकालीन व कायमस्वरूपी भरण्यात याव्यात.
  6. - राज्यातील विनाअुदानित तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे.

 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर