रोजगार न देऊ शकणाऱ्या पदव्या परत घ्या :  नेट/सेटग्रस्त विद्यार्थ्यांची कुलगुरूंकडे मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:29 PM2018-05-02T20:29:05+5:302018-05-02T20:29:05+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आम्ही पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेवून, उत्कृष्ट गुणांसह पदव्या संपादित केल्या आहेत. नेट/सेट/पीएच.डी आदी उच्च शिक्षण घेवूनही आम्हाला शिपायांइतकाही पगार मिळत नाही.

take Return the non-job degrees : Demand for NET / SET students to Vice Chancellor | रोजगार न देऊ शकणाऱ्या पदव्या परत घ्या :  नेट/सेटग्रस्त विद्यार्थ्यांची कुलगुरूंकडे मागणी  

रोजगार न देऊ शकणाऱ्या पदव्या परत घ्या :  नेट/सेटग्रस्त विद्यार्थ्यांची कुलगुरूंकडे मागणी  

Next
ठळक मुद्दे नेट/सेट/पीएचडी संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी कुलगुरूंना निवेदनगावाकडे ‘लई शिकला पण, वाया गेला’ अशी आमची टिंगल

पुणे : आम्ही मोठया कष्टाने आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एमए , एमकॉम, एमएस्सी, पीएचडी, सेट या पदव्या घेतल्या आहेत. मात्र,तरीही आम्हांला नोकऱ्या मिळू शकत नाहीत. उच्चशिक्षण घेऊन अवघ्या ५ ते ६ हजार रूपयांमध्ये आम्हांला राबावे लागत आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या पदव्यांचा भार आम्हांला असह्य झाला आहे, तरी विद्यापीठाने या पदव्या परत घ्याव्यात अशी मागणी नेट/सेट ग्रस्त विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे.
   नेट/सेट/पीएचडी संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी कुलगुरूंना निवेदन दिले. आमचे पोट भरू न शकणाऱ्या पदव्या परत घ्याव्यात, सुशिक्षित बेरोजगार म्हणून २५ लाख रूपयांचे बिनव्याजी कर्ज द्यावे. (संस्थाचालकांना नोकरीसाठी लाच म्हणून), विद्यापीठाच्या नावाने चहा आणि वडापावचे ठेले लावण्याची परवानगी मिळावी, बेरोजगारांना रुपये २५,०००/- पर्यंत चोरी करण्याचे लायसन्स मिळण्यासाठी कुलगुरूंनी शासनाकडे प्रस्ताव द्यावा, सुशिक्षित बेरोजगार म्हणून हातभट्टी दारूचे गुत्ते चालविण्याचे परवाने मिळवण्यासाठी शासनाकडे कुलगुरूंनी शिफारस करावी आदी मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. संघर्ष समितीचे समन्वयक महावीर साबळे, सुरेश देवडे यांच्यासह अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.      
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आम्हीपदवी व पदव्युत्तर शिक्षण घेवून, उत्कृष्ट गुणांसह पदव्या संपादित केल्या आहेत. पण या पदव्या प्राप्त परिस्थितीमध्ये कवडीमोल ठरत आहेत. नेट/सेट/पीएच.डी आदी उच्च शिक्षण घेवूनही आम्हाला महाविद्यालयांमध्ये शिपायांइतकाही पगार मिळत नाही. शासनाने जून २०१७ पासून प्राध्यापक भरतीवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.  नोकरी मिळेल या आशेवर आमच्या आयुष्यातली उमेदीची सात-आठ वर्षे निघून गेली. गावाकडे ‘लई शिकला पण, वाया गेला’ अशी आमची टिंगल केली जात आहे. आम्हाला वाटतं आपल्या शिक्षण व्यवस्थेचे हेच सर्वात मोठे अपयश आहे. त्यामुळे आता या पदव्यांचा भार असह्य झाला आहे. या पदव्यांना अनुरूप नसणारी इतर कोणतीही काम करताना आम्हांला या पदव्या आडव्या येतात त्यामुळे या पदव्या विद्यापीठाने परत घ्याव्यात अशी मागणी नेट/सेट/पीएचडी संघर्ष समितीच्यावतीने कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. 
.........
आता जगणं असह्य  
नेट/सेट/पीएचडी संघर्ष समितीच्यावतीने सुशिक्षित बेरोजगार म्हणून २५ लाख रूपयांचे बिनव्याजी कर्ज द्यावे. (संस्थाचालकांना नोकरीसाठी लाच म्हणून), विद्यापीठाच्या नावाने चहा आणि वडापावचे ठेले लावण्याची परवानगी मिळावी, बेरोजगारांना रुपये २५,०००/- पर्यंत चोरी करण्याचे लायसन्स मिळण्यासाठी कुलगुरूंनी शासनाकडे प्रस्ताव दयावा, सुशिक्षित बेरोजगार म्हणून हातभट्टी दारूचे गुत्ते चालविण्याचे परवाने देण्याची शिफारस करावी आदी मागण्या केल्या आहेत. उपरोधिक पध्दतीने त्यांनी आपल्या मागण्या मांडून त्यांच्या मनातील असंतोष व्यक्त केला.

Web Title: take Return the non-job degrees : Demand for NET / SET students to Vice Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.