शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : आत्मविश्वासाची ‘चेतना’ जागृत करणारी संस्था : आयुक्त चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:49 IST

चेतना विकास मंदिर ही फक्त ‘विशेष मुलांची शाळा’ नसून, त्या मुलांच्या विविध गुणांना वाव देऊन त्यांच्यातील आत्मविश्वासाची चेतना जागृत करण्याचे काम करणारे केंद्र आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.

ठळक मुद्देआत्मविश्वासाची ‘चेतना’ जागृत करणारी संस्था : आयुक्त चौधरीचेतना विकास मंदिर वार्षिक पारितोषिक वितरण

कोल्हापूर : चेतना विकास मंदिर ही फक्त ‘विशेष मुलांची शाळा’ नसून, त्या मुलांच्या विविध गुणांना वाव देऊन त्यांच्यातील आत्मविश्वासाची चेतना जागृत करण्याचे काम करणारे केंद्र आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.शेंडा पार्क येथील चेतना विकास मंदिरमध्ये शनिवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी क्रीडा स्पर्धांसह विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.चौधरी म्हणाले, सामाजिक बांधीलकी ठेवत चेतना विकास मंदिरने अनेक मुलांना मुख्य प्रवाहात आणले आहे. त्याचसोबत येथील प्रत्येक मुलाला स्वावलंबी बनविले जाते, हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र त्या योजनांची माहिती अजूनही सर्व स्तरांपर्यंत व्यवस्थित पोहोचलेली दिसत नाही. आरोग्य, शिष्यवृत्तीसारख्या योजनांचा यामध्ये समावेश आहे. त्या योजना आपल्या येथील मुलांसाठी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी आयुक्त चौधरी यांनी चेतना विकास मंदिरच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली; तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी केली. यावेळी क्रीडा स्पर्धांसह विविध शैक्षणिक उपक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ‘स्पर्श जाणिवेतून मानवते’कडे या सामाजिक संस्थेचे असिम जमादार, सौरभ पाटील यांच्यासह सायबर येथील सामाजिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसह, संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे, सचिव दिलीप बापट, खजानिस श्रीराम भिसे, मुख्याध्यापिका संध्या इनामदार यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

प्रशांत कोठावळे यांनी सूत्रसंचालन केले; तर अनिल वागवेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष पवन खेबुडकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी पाहुण्यांची परिचय करून दिला.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDisability Development Board, Washimअपंग विकास महामंडळ वाशिम