Lokmat Kolhapur Maha Marathon : दिव्यांग बांधावसह विशेष मुलांचा सहभाग; प्रोत्साहनपर रनचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 07:03 PM2018-02-18T19:03:03+5:302018-02-18T19:04:32+5:30

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये अनेक दिव्यांग बांधवांसह विशेष मुलांनी धाव घेत अन्य धावपटूंप्रमाणेच आपला उत्साह दाखवून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले.

Lokmat Kolhapur Maha Marathon special children participate with Divyang Bandhav; Organizing Runs in Incentives | Lokmat Kolhapur Maha Marathon : दिव्यांग बांधावसह विशेष मुलांचा सहभाग; प्रोत्साहनपर रनचे आयोजन

Lokmat Kolhapur Maha Marathon : दिव्यांग बांधावसह विशेष मुलांचा सहभाग; प्रोत्साहनपर रनचे आयोजन

Next
ठळक मुद्देदिव्यांग बांधावसह विशेष मुलांचा सहभागप्रोत्साहनपर रनचे आयोजन

कोल्हापूर : ‘ब्लेड रनर’ आॅस्कर पिस्टोरियने कृत्रिम पाय लावून सशक्त असलेल्या पुरुषांच्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत सर्वांनाच धक्का दिला होता. एरव्ही सराव नसताना दोन पायांसह धावतानाही अनेकांची तारांबळ उडते. मात्र, ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये अनेक दिव्यांग बांधवांसह विशेष मुलांनी धाव घेत अन्य धावपटूंप्रमाणेच आपला उत्साह दाखवून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले.

सकाळी आठ वाजता या मॅरेथॉनची सुरुवात झाली. त्यामध्ये चेतना विकास मंदिर व जिज्ञासा विकास मंदिर येथील ५० मुलांनी सहभाग घेतला होता. ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा, महामॅरेथॉनच्या संयोजिका रूचिरा दर्डा, आमदार प्रकाश अबिटकर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, क्लायमेक्स जाहिरात संस्थेचे उदय जोशी, महालक्ष्मी इस्पातचे अभिषेक गांधी यांच्या हस्ते झाले.

महामॅरेथॉनमध्ये विशेष मुलांसाठी खास एक किलोमीटर ‘प्रोत्साहन रन’चे आयोजन केले. या रनची सुरवात होताच उपस्थितीत धावपटू व पालकांनी टाळ्या वाजवून सर्वांनाच प्रोत्साहन दिले. काही पालक व संबंधित लोक दिव्यांगासमवेत या रनमध्ये सहभाग झाले व पळण्यासाठी उर्जा दिली.

तीन व पाच किलोमीटर फिनिशिंग लाईन येथे हे धावपटू येताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला तर आपण आपले टार्गेट पूर्ण केल्याचा आनंद या मुलांच्यावर चेहऱ्यांवर दिसत होता. ‘या स्पर्धेत सहभागी होऊन आम्हाला खूप आनंद झाला, आम्हाला येथे परत येण्यासाठी आवडेल’ अशा बोलक्या प्रतिक्रिया विशेष मुलांनी व्यक्त केल्या.

 

गतिमंद मुले हे समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत, हे आपण सर्वांनी ओळखून आमच्या मुलांना यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. येथील नेटके नियोजन, व्यवस्था पाहून मुले खूप खूश झाली आहेत.
विशाल दीक्षित,
जिज्ञासा विकास मंदिर
 

 

Web Title: Lokmat Kolhapur Maha Marathon special children participate with Divyang Bandhav; Organizing Runs in Incentives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.