शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

कोल्हापूर : दौलत कारखाना मालमत्ता विक्रीस जिल्हा बँकेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:54 IST

चंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता विक्रीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आक्षेप घेतला आहे. कारखान्याच्या सर्व मालमत्ता बँकेकडे कर्जापोटी रजिस्टर तारण असल्याने मालमत्तांची विक्री करू नका, असे पत्रच जिल्हा बँकेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी चंदगडचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्याकडे पाठविले आहे. या पत्राची एक प्रत बँकेने जिल्हाधिकाऱ्यांकडेही सादर केली.

ठळक मुद्देदौलत कारखाना मालमत्ता विक्रीस जिल्हा बँकेचा विरोधकोल्हापूर जिल्हा बँकेचे चंदगडच्या तहसीलदारांना पत्र

कोल्हापूर : चंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता विक्रीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आक्षेप घेतला आहे. कारखान्याच्या सर्व मालमत्ता बँकेकडे कर्जापोटी रजिस्टर तारण असल्याने मालमत्तांची विक्री करू नका, असे पत्रच जिल्हा बँकेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी चंदगडचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्याकडे पाठविले आहे. या पत्राची एक प्रत बँकेने जिल्हाधिकाऱ्यांकडेही सादर केली.गुरुवारी एका दैनिकात कारखान्याच्या मिळकत विक्रीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. यात न्यूट्रियंट्स कंपनीने थकीत देणी भागविण्यासाठी कारखान्याच्या मालकीच्या जमिनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचल्यानंतर जिल्हा बँकेने तातडीने पावले उचलत पत्र काढले आहे.

या पत्रात बँकेने म्हटले आहे की, दौलत साखर कारखाना बँकेच्या थकबाकीत गेल्यामुळे बँकेने सिक्युरिटायझेशन कायद्याद्वारे कारवाई करून १२ आॅगस्ट २०१६ च्या कराराने कारखाना मिळकत न्यूट्रियंट्स अ‍ॅग्रो फ्रुट्स प्रा. लि. या कंपनीस ४५ वर्षे कराराने चालविण्यास दिला होता.

या कंपनीने करारातील अटी व शर्तींचा भंग करून २५ मार्च २०१८ रोजीचा बँकेत देय हप्ता, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम, कामगारांचे वेतन, शासकीय देणी, तोडणी वाहतूकदारांची बिले थकविली. तसेच कंपनीस बँकेने दिलेल्या साखर तारणावरील प्लेज कर्ज व हंगामपूर्व कर्जदेखील थकविल्याने बँकेत ३१ मार्च २०१८ रोजी याची थकबाकीपोटी तरतूद करावी लागली आहे. त्याचबरोबर न्यूट्रियंट्स अ‍ॅग्रो फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सन २०१६-१७ मध्ये उत्पादित केलेली शिल्लक साखर दोन वर्षांची असल्यामुळे साखर खराब होण्याचा धोका आहे.न्यूट्रियंट्स कंपनीने भाडेकरारातील अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे सदर भाडेकराराबाबत बँकेच्या संचालक मंडळाने ३० जुलैैच्या सभेत ठराव क्रमांक १२ अन्वये करार रद्द करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. याबाबतची जाहीर नोटीस बँकेने ५ आॅगस्टलाच दैनिकातून प्रसिद्ध केली आहे.

कंपनीने या निर्णयाविरुद्ध किरकोळ दिवाणी अर्ज नंबर २४९ / २०१८ चा १० आॅगस्टला दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, कोल्हापूर येथे स्थगितीकरिता अर्ज दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी १० आॅक्टोबरला होऊन न्यायालयाने न्यूट्रियंट्स अ‍ॅग्रो फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेड, गोकाक या कंपनीस एक महिन्याच्या आत म्हणजेच १० नोव्हेबर २०१८ पर्यंत भाडेकराराप्रमाणे देय हप्ता व त्यावरील व्याज, दंडव्याज व जी.एस.टी.सह रक्कम भरणा करण्याचा आदेश दिला आहे. ही बिले दिलेल्या मुदतीत न भरल्यास बँकेस पुढील कार्यवाही करून मालमत्तेचा ताबा घेता येईल, असाही आदेश केलेला आहे.कंपन्यांची मालमत्ता विक्री करा, कारखान्याची नाहीबँकेने ११ एप्रिल २०१६ रोजी कारखाना चालविण्यास देण्याबाबतची निविदा प्रसिद्ध करताना त्यामध्ये बँक थकबाकी रकमेबरोबरच शेतकऱ्यांची थकीत एफआरपी, कामगारांची देणी, संचालक मंडळ काळातील शासकीय देणी अंतर्भूत करून जाहिरात प्रसिद्ध केली होती.

कंपनीने मुदतीत पैसे न भरल्यास मालमत्तेचा ताबा घेऊन पुन्हा टेंडर प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात येणार आहे. तथापि सदरची देणी ही ज्या कंपनीस कारखाना चालविण्यास दिला होता, त्या तासगावकर शुगर्स व न्यूट्रियंट्स अ‍ॅग्रो फ्रुट्स या दोन कंपन्यांनी भागविण्याची असल्यामुळे सदर दोन्ही कंपन्यांची मालमत्ता जप्त करून संबंधितांना देणे आवश्यक होते. त्याकरिता कारखान्याची मालमत्ता विक्री करण्याची आवश्यकता नव्हती व नाही, असेही जिल्हा बँकेने पत्राद्वारे आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील