शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :सतेज कृषी प्रदर्शन खुले: शेती सुलभ करणाऱ्या यंत्राची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 11:22 IST

कोल्हापूर : आधुनिक शेतीचा मंत्र घेऊन तपोवनच्या मैदानावर भरलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी थाटात उद्घाटन झाले. सोमवार (दि. ३१) ...

ठळक मुद्देसतेज कृषी प्रदर्शन खुले: शेती सुलभ करणाऱ्या यंत्राची रेलचेलतपोवन मैदानावर सोमवारपर्यंत चालणार

कोल्हापूर : आधुनिक शेतीचा मंत्र घेऊन तपोवनच्या मैदानावर भरलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी थाटात उद्घाटन झाले. सोमवार (दि. ३१) पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात शेती सुलभ करणाऱ्या अत्याधुनिक यंत्रे व अवजारांची रेलचेल आहे. देशी-विदेशी भाज्या, जातिवंत पशुपक्ष्यांसह बांबूची सायकल आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.कळंबा जेलसमोर तपोवनच्या विस्तीर्ण मैदानावर भरलेल्या सतेज कृषी पशू प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्र अवगत करणाऱ्या अत्याधुनिक कृषी अवजारांवर अधिक भर देण्यात आला आहे. लहान-मोठे ट्रॅक्टर, पॉवर टिलरसह फवारणी पंपाचे असंख्य प्रकार प्रदर्शनात उपलब्ध आहेत.घरच्या घरी शेंगदाण्यापासून तेल काढणाऱ्या लहान पोर्टेबल घाण्यासह गृहोपयोगी वस्तूंचीही प्रदर्शनात रेलचेल आहे. सिंगल फेजवर चालणारे लहान आकाराचे पूर्णपणे सुरक्षित कडबा कुट्टी यंत्र प्रदर्शनात विशेष लक्ष वेधत आहे. यात दोन प्रकारे वैरण बारीक करता येते.शेती विभागात १४ किलोंचा भोपळा, चिनी कोबी, प्लेट्युस, तेलताड, गॅलन जातीचे वांगे, बाणवली जातीचे नारळ विशेष लक्ष वेधून घेत आहेत. बांबूपासून निर्मिती केलेल्या अनेक वस्तू येथे पाहावयास मिळत आहेत. याशिवाय बांबूची रोपेही उपलब्ध आहेत.

बांबूपासून तयार केलेली सायकल, फर्निचरसह अनेक शोभेच्या वस्तू आहेत. पशुपक्षी विभागात कोकणी देशी गाईसह नांदेडची कंधारी, दावणी, खिलारी गाई, बैल, वळू आहेत. खाद्यपदार्थ विभागात बचत गटांद्वारे निर्मित शाकाहारी मांसाहारी पदार्थांसह फास्ट फूडचे स्टॉल रसिक खव्वयांची दाद मिळवत आहेत.

दत्त कारखान्याचा स्टॉलउसाचे एकरी १५० टन आणि खोडव्याचे उच्चांकी उत्पादन घेण्याचा मान मिळविणाऱ्या शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने आपले हे तंत्र अन्य शेतकऱ्यांना कळावे यासाठी माहिती देणारा स्वतंत्र स्टॉल प्रदर्शनात मांडला आहे.

शेतकऱ्यांचा गौरवप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यात जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, कृषी महाविद्यालयासह राज्यस्तरावर भात, सोयाबीन पीक स्पर्धेत विजय मिळविलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेतीशाळा, फूलशेती, हरितगृह, आदींमध्ये नावलौकिक मिळविलेल्या शेतकºयांनाही गौरविण्यात आले. 

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर