शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North By Election: जाधव, कदम उद्या भरणार अर्ज, शक्तीप्रदर्शनासाठी जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 11:43 IST

आतापर्यंत २९ जणांनी ५८ अर्ज नेले असून, एकाच उमेदवाराने सोमवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याची मुदत २४ पर्यंत आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरसाठी काँग्रेसतर्फे जयश्री जाधव आणि भाजपतर्फे सत्यजित कदम हे बुधवारी एकाच दिवशी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या दिवशीच शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही पक्ष सज्ज झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोल्हापूरला परतले आहेत. जयश्री जाधव यांना आमदार करूनच ‘मातोश्री’वर घेऊन येऊ, असा शब्द त्यांनी ठाकरे यांना दिला आहे.आतापर्यंत २९ जणांनी ५८ अर्ज नेले असून, एकाच उमेदवाराने सोमवारी अर्ज दाखल केला. यासाठी अर्ज भरण्याची मुदत २४ पर्यंत आहे. जयश्री जाधव या बुधवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र आणत शक्तीप्रदर्शन करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली आहे.दुसरीकडे सत्यजित कदम यांच्या अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीला दहा वाजता दसरा चौकातून सुरूवात होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्याचे नियोजन असून, सहकारी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा