शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर 'उत्तर’ची पोटनिवडणूक : पैसे वाटणाऱ्या सहा जणांवर गुन्हे, तीन ठिकाणी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 11:40 IST

‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक चुरशीची होत असून मतदारांना विविध प्रलोभने दाखवून मतदान आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक चुरशीची होत असून मतदारांना विविध प्रलोभने दाखवून मतदान आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न झाला. मतदानाच्या पूर्वसंध्येला सोमवारी वारे वसाहत, मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिर, दसरा चौकातील सुतारवाडा परिसरात मतदारांना पैशाचे वाटप करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी भरारी पथकांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुना राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हे नोंदवले. तर तिन्हीही घटनेतील १ लाख २६ हजार ३० रुपये पोलिसांनी जप्त केले.

आज, मंगळवारी मतदान होणार असल्याने मतदारांना पैशाची प्रलोभने दाखविण्याची शक्यता असल्याने निवडणूक विभागाची भरारी पथके, पोलीस पथके तसेच विरोधकांची कार्यकर्त्यांची फळी सतर्क झाली होती. त्यातूनही मतदारांना पाकिटातून पैसे वाटण्याचे प्रसंग घडले. त्यावर काही मतदारांची नावेही मिळून आली. गुन्हा दाखल सहा जणांवर भा. दं. वि. कलम १७१ ई प्रमाणे अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.

  • वारे वसाहत (संभाजीनगर परिसर) : मोपेड टाकून अज्ञात पळाला. मोपेड जप्त, अज्ञात मोपेड (नं. एमएच ०९, ईटी ३१७५) चालकावर गुन्हा दाखल. कारवाईत मोपेडच्या डिकीत ४० हजारांची रोकड, ५०० रुपये असलेली दोन पांढरी पाकिटे मिळाली.
  • जय पद्मावती मंदिर (मंगळवार पेठ) : अशोक शंकरराव देसाई (वय ५७, रा. फुलेवाडी रिंगरोड), विजय महादेव जाधव (४८, रा. राजारामपुरी ४ थी गल्ली), संतोष सदाशिव माळी (४०, रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हे दाखल. कारवाईत ४५,५०० रुपये जप्त
  • सुतारवाडा (दसरा चौक) : प्रवीण जयवंत कणसे (रा. भोसलेवाडी), जोतीराम तुकाराम जाधव (४४, रा. न्यू शाहूपुरी, घोरपडे गल्ली. मूळ- जयसिंगपूर) यांच्यावर गुन्हे दाखल. कारवाईत ३९,५३० रुपये जप्त केले. 

भाजपने पैसे वाटल्याच्या तक्रारी पराभवाच्या नैराश्येतून; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलभाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या महाविकास आघाडीच्या तक्रारी या पराभवाच्या नैराश्येतून केल्या असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केली. बुथवरील कार्यकर्त्यांना जेवणाचे पैसे द्यायचे नाहीत का, त्यांच्याकडे काय लाखाचे डबोले सापडले की काय, अशी विचारणाही त्यांनी केली. आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तरसाठी आज मतदान होत आहे. आमचे कार्यकर्ते बुथ रचनेची माहिती घेत फिरत आहेत. बुथवर काम करणाऱ्या लोकांच्या जेवणासाठी म्हणून त्यांना काही रक्कम दिली जात असताना, त्यांच्याविरुध्द पैसे वाटताना सापडले म्हणून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. परंतु अशा गुन्ह्यांना भाजप घाबरत नाही. पोलीस यंत्रणांचा वापर करून ही दडपशाही सुरू आहे. या मतदार संघात भाजपचा विजय होणार हे नक्की असल्यानेच, शेवटचा प्रयत्न म्हणून कार्यकर्त्यांना असा त्रास दिला जात आहे.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारी