शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:14 IST

Madhureemaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शेवटच्या दहा मिनिटांत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतली.

Kolhapur North Assembly Constituency : काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये सतेज पाटलांना मोठा धक्का बसला आहे.  मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील यांना संताप अनावर झाला होता. मधुरीमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. दुपारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर रात्री कार्यकर्त्यांशी बोलताना  सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर आता मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार का घेतली याचे कारण समोर आलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपतींनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला. मधुरिमाराजे छत्रपती निवडणुकीतून बाहेर पडल्याबद्दल सतेज पाटील यांनी निराशा व्यक्त केली होती. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना, मग मी पण दाखवली असती माझी ताकद, अशा शब्दांत  सतेज पाटील  यांनी रोष व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून ते रागाने निघून गेले. 

शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील मोदी यांनी आता सगळा घटनाक्रम सांगितला आहे. "शाहू महाराज हे राजेश लाटकर यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यावेळी लाटकर यांच्या वडिलांनी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार का नाही असं विचारलं. त्यावेळी शाहू महाराज यांनी मी माझ्या सुनेला माघार घ्यायला सांगून तुमच्या मुलाला पाठिंबा देण्याचा न्याय मी देऊ शकतो असं सांगितले. काल अर्ज माघार घेण्याची दिवशी राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी यासाठी आमचा प्रयत्न होता. त्यावेळी दोन वाजता लाटकर यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना फोन करुन माझ्या मुलाला न्याय देणार आहात का असं विचारलं. त्यावेळी शाहू महाराजांनी आपल्या सुनेला माघार घेण्याचे आदेश दिले. ही घटना आम्हाला कोणाला माहिती नव्हती. पण शाहू महाराजांचा हा मोठा निर्णय कोल्हापुरच्या पुरोगामी विचारांना बळ देणारा आहे. शाहू महाराज आणि लाटकरांचे बोलणं झालं नसतं तर निश्चितच राजेश लाटकर माघार घेऊन आम्हाला पाठिंबा देणार होते," असं सुनील मोदी यांनी म्हटलं.

नाईलाजाने आम्हाला माघार घ्यावी लागली - मधुरिमाराजे छत्रपती 

"राजेश लाटकर सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारून मला उमेदवारी दिली. सर्वसामान्यांच्या तोंडचा घास काढून घेऊन आम्हाला उमेदवारी देणे ही गोष्ट आम्हाला मनापासून रुचली नव्हती. एक तर तुम्ही लढा, आम्ही थांबतो किंवा आम्ही लढतो, तुम्ही थांबा, असे लाटकर यांना सांगूनही बंडखोरीबाबत मार्ग निघाला नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला माघार घ्यावी लागली, असे स्पष्टीकरण मधुरिमाराजे छत्रपती यांनी दिलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस