शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: आठवड्यात दुप्पट रकमेच्या आमिषाने चौदा कोटींचा गंडा, १० बँक खाती गोठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 13:46 IST

नदाफवर चार पोलिस ठाण्यांत गुन्हे

कोल्हापूर : गुंतवलेली रक्कम आठवड्यात दुप्पट करून देऊ तसेच ४५ दिवसांत कमी व्याज दराचे कर्ज मिळवून देऊ, असे आमिष दाखवून नदाफ-मकानदार टोळीने जिल्ह्यात १४ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, या टोळीने लोकांकडून ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम उकळल्याचा अंदाज आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी वर्तविला.रेश्मा बाबासो नदाफ (वय ४१, रा. चंदूर रोड, इचलकरंजी) आणि शब्बीर बाबालाल मकानदार (वय ६२, रा. नदीवेश नाका, इचलकरंजी) यांच्यासह अन्य नऊ संशयितांनी दिल्लीतील युनिक फायनान्स कंपनीचे एजंट असल्याचे सांगत लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. डिसेंबर २०२१ पासून ते ऑगस्ट २०२२ या नऊ महिन्यांत नदाफ-मकानदार टोळीने लोकांकडून ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम उकळली.

सुरुवातीला ४५ दिवसांत कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतले. प्रोसेसिंग फीच्या नावाखाली कर्जाच्या एकूण रकमेपैकी पाच टक्के रक्कम आधीच घेतली. त्यानंतर लोकांना सात दिवसांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला छोट्या रकमा दुप्पट देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोठ्या रकमा घेऊन पोबारा केला. नदाफ आणि मकानदार यांच्या अटकेनंतर अधिक चौकशीत फसवणुकीच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. लवकरच संशयितांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार असल्याचेही पिंगळे यांनी सांगितले.१० बँक खाती गोठवलीरेश्मा नदाफ - ३, आर्षद नदाफ - ४, जयवंत चव्हाण - २, सुरेखा चव्हाण - १ या संशयितांची १० बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत.नदाफवर चार पोलिस ठाण्यांत गुन्हेसंशयित रेश्मा नदाफ हिच्यावर २०१६मध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात, तर २०१९मध्ये सोलापूर शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात कर्ज देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. २०२२मध्ये मुरगूड आणि राधानगरी पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नदाफ-मकानदार टोळीने जिल्ह्यात शेकडो लोकांना गंडा घातला असून, त्यापैकी अनेकजण अजूनही तक्रार देण्यासाठी आलेले नाहीत. फसवणूक झालेल्या लोकांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्यात. - श्रीकांत पिंगळे, पोलिस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस