शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोल्हापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 7:09 PM

कोल्हापूर महानगरपालिकेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्पशनिवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभापती आशिष ढवळे सादर करतील. कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असली तरी स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत झालेल्या गद्दारीमुळे भाजपच्या ढवळे यांना सभापती होण्याचा मान मिळाला. सध्या राज्यात, देशात भाजपची सरकारे असल्यामुळे ढवळे अर्थसंकल्पातून कोल्हापूरकरांना काय देणार, याबाबत मात्र महापालिका वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणारभाजप सभापतींकडून कोल्हापूरकरांच्या अपेक्षा

कोल्हापूर : महानगरपालिकेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्पशनिवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभापती आशिष ढवळे सादर करतील. कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असली तरी स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत झालेल्या गद्दारीमुळे भाजपच्या ढवळे यांना सभापती होण्याचा मान मिळाला. सध्या राज्यात, देशात भाजपची सरकारे असल्यामुळे ढवळे अर्थसंकल्पातून कोल्हापूरकरांना काय देणार, याबाबत मात्र महापालिका वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ७ मार्चला सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित तसेच सन २०१८-१९ या वर्षाचे नवीन अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी त्यावर अभ्यास करून काही फेरफार केले आहेत. सभापती आशिष ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांच्यासमवेत त्याकरिता सतत बैठका सुरू होत्या. शुक्रवारी सायंकाळी अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरविला गेला.वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले आशिष ढवळे हे महापालिका सभागृहात स्वत: पॉवरपॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याची पूर्वतयारी शुक्रवारी घेण्यात आली.

यापूर्वी मुरलीधर जाधव यांनी अशाप्रकारे अर्थसंकल्प सादर केला होता; परंतु ढवळे स्वत: त्याचे वाचन आणि स्पष्टीकरण देणार आहेत. विशेष म्हणजे ढवळे भाजपचे नगरसेवक असल्यामुळे त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून निधीकरिता आश्वासन घेऊन काही नवीन व नावीन्यपूर्ण योजना तसेच गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या योजनांच्या पूर्ततेचा प्रयत्न यावर्षीच्या अर्थसंकल्पाद्वारे करतील अशी अपेक्षा आहे.राज्य नगरोत्थान योजनेतील दुसरा टप्पा, ‘सेफ सिटी’चा दुसरा टप्पा, केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील खाऊ गल्लीचा विकास, शहरातील सार्वजनिक बागांचा विकास, केंद्र सरकारकडून के.एम.टी.करिता विजेवर चालणा बसेस घेणे, शहरातील महत्त्वाचे चौक सुशोभिकरण करणे, पाच उड्डाणपूल उभारण्याची योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशी काही महत्त्वाची कामे प्रलंबित आहेत. या कामांना अर्थसंकल्पात कितपत न्याय मिळतो हा एक उत्सुकतेचा विषय आहे.

महापालिकेत भाजपचा सभापती प्रथमच झाल्यामुळे माझ्याकडून शहरवासीयांच्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि प्रशासनाकडून त्या पूर्ण करून घेण्याच्या आपला नक्कीच प्रयत्न राहील. पुढील वर्षात चांगले काम करून दाखविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.- आशिष ढवळे, स्थायी सभापती सभापती

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर