शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या फायद्यासाठीच हद्दवाढीचा डाव, हद्दवाढविरोधी सरपंचांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:38 IST

आठ गावेच काय एक इंचही देणार नाही

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत फायदा उचलण्यासाठीच आठ गावांना घेऊन हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे, असा आरोप करीत २० गावांतील सरपंचांनी कोणत्याही परिस्थितीत एक इंचही हद्दवाढ होऊ देणार नाही, असा निर्धार गुरुवारच्या बैठकीत केला.यावेळी तोडा आणि फोडा असे धोरण अवलंबून आधी आठ गावे, नंतर वीस, ४२ गावे घेतली जातील. म्हणून आठ गावच्या हद्दवाढीविरोधातही २० गावांतील सरपंच तीव्र संघर्ष करतील, असा इशारा दिला. सर्वपक्षीय कोल्हापूर महापालिका हद्दवाढ विरोधी समितीतर्फे येथे हॉटेलमध्ये बैठक झाली. समितीचे अध्यक्ष उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण अध्यक्षस्थानी होते.चव्हाण म्हणाले, हद्दवाढीचा विषय कृती समितीमधील आठ ते दहा लोकांनी सध्या ऐरणीवर आणला आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. शहरातील पाणी, कचऱ्याची समस्या गंभीर आहे. अनेक भागात ड्रेनेज नाहीत. शाळेत असल्यापासून अंबाबाई तीर्थ क्षेत्रातून विकास होणार असे नुसतेच ऐकतो आहे. पण अजूनही काहीही झालेले नाही. पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे. शहरातील लोकप्रतिनिधी तीन वेळा आमदार झाले. त्यांना शहराचा विकास करता आलेला नाही. भाजपचे सहपालकमंत्री यांनी कोल्हापुरात आल्यानंतर पुण्याच्या हद्दवाढीनंतर समावेशीत गावांचा विकास झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे. 

वाचा- हद्दवाढीची चर्चा नुसतीच, हालचाल नाही कसलीच; मुख्यमंत्र्यांकडून तोंडी, लेखी सूचना नाहीतरीही हद्दवाढ लादल्यास संघर्ष करू गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे म्हणाले, शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात महापालिका यशस्वी झालेली नाही. लोकप्रतिनिधी कोटींचा निधी आणल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात काम दिसत नाही. गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, भाग्यश्री पारके, तानाजी पाटील यांची भाषणे झाली. किरण आडसूळ यांनी प्रस्ताविक केले.बैठकीस बालिंगा सरपंच राखी भवड, पाचगाव सरपंच प्रियंका पाटील, नागदेवाडी सरपंच अमृता पोवार, वळीवडे सरपंच रूपाली कुसाळे, सरनोबतवाडीच्या शुभांगी आडसूळ, नागाव सरपंच विमल शिंदे, कळंबा सरपंच सुमन गुरव, मोरेवाडी सरपंच ए. व्ही. कांबळे, कंदलगावचे सरपंच राहुल पाटील, पाडळीचे सरपंच तानाजी पालकर, आंबेवाडीचे सरपंच मारुती पाटील, वाडीपीरच्या सरपंच अनिता खोत, संदीप दरेकर उपस्थित होते.

माझा जन्म शिवाजी पेठेतला..गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगांवे यांनी शहरातील विकासकामे, महापालिकेचा कारभाराचे वाभाडेच काढले. त्या म्हणाल्या, माझा जन्म शिवाजी पेठेतील आहे. शहरापेक्षा चांगला विकास २० गावांत झाला आहे. महापालिका सेवा, सुविधा देऊ शकत नाही. वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर महापालिकेस आपल्या इमारतीमधील स्वच्छतागृहास कुलूप लावून ठेवावे लागते, इतकी वाईट अवस्था आहे. यामुळे हद्दवाढीचा बालहट्ट कोणीही करू नये.

क्षीरसागर यांचा स्वार्थउजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडेकर म्हणाले, हद्दवाढीला आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके यांचा विरोध आहे. वीस गावांसोबत हे दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत. मात्र शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा अधिक स्वार्थ असल्याने हद्दवाढ लादत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन हद्दवाढ झाली पाहिजे, असे एका बाजूला ते म्हणतात आणि दुसऱ्या बाजूूला मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आठ गावांना घेऊन हद्दवाढ करा, असा आग्रह धरतात. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. ते तीन वेळा आमदार होऊन शहराचा विकास करू शकलेले नाहीत याचे उत्तर द्यावे.

राजकीय जीवनात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न पाहता शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काम करीत आहे. हद्दवाढीमुळे इतर शहरांचा झालेला विकास पाहता कोल्हापूर मागे पडल्याचे दिसत आहे. म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेऊनच हद्दवाढ होईल. जिल्ह्याचा पर्यायाने शहराच्या विकासाची गरज ओळखून हद्दवाढीसाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. - राजेश क्षीरसागर, आमदार, कोल्हापूर उत्तर