शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghodbunder Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी
2
"CM फडणवीसांनी शेजारच्या खुर्च्यांवर कोण बसलंय ते बघावं"; भीती संगम म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...!
4
बापानं किडनी देऊन वाचवलं, कर्जाचा डोंगर उपसून उपचार केले; पण त्याच मुलानं आयुष्य संपवलं
5
लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार
6
एका चुकीच्या क्लिकने 'आयुष्यभराची कमाई' साफ; सायबर भामट्यांनी चलानच्या नावाखाली लुटले ३.६ लाख
7
देशातील पहिली फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगवाली कार ट्रकमध्ये घुसली; मध्य प्रदेशच्या माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू 
8
सरेंडर व्हायला किती वेळ लागतो? मैत्री एका बाजूला म्हणत राज ठाकरेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघाती प्रहार
9
Rahul Gandhi : "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र
10
बजाज-अलायन्झचा २४ वर्षांचा प्रवास संपला! संजीव बजाज यांची 'मास्टरस्ट्रोक' डील; आता पूर्ण मालकी भारतीयांकडे
11
'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
12
एसबीआय, बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा... सर्वात स्वस्त Home Loan कोण देतंय? ६० लाखांवर किती ईएमआय?
13
"इराण एक महान देश...!"; आता काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? नेमकं काय म्हणाले? मोठा खुलासा करत दिला थेट इशारा!
14
कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...
15
"आधी गोळ्या घालू मग प्रश्न विचारू"; ट्रम्प यांच्या लष्करी धमकीला 'या' देशाने दिलं सडेतोड उत्तर
16
तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे
17
'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा
18
हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार
19
१० जानेवारी: गुरु-आदित्य योग: तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारणासाठी उत्तम योग; करा 'हा' उपाय 
20
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करू शकते रिलायन्स इंडस्ट्रीज; का आणि कशी बदलली परिस्थिती?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: दहा तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार; चार सदस्य निवडण्याची प्रथमच संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:06 IST

मतदान आणि मतमोजणी या दोन्ही टप्प्यांवरील तयारी करण्यात यंत्रणेतील सर्व कर्मचारी व्यस्त

कोल्हापूर : चार लाख ९४ हजार मतदार, ५९५ मतदान केंद्रे, ३०९६ कर्मचारी इतके प्रचंड नेटवर्क असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, दि. १५ जानेवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच, अशी दहा तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. एकाच वेळी एका मतदाराला चार मते देण्याची संधी महापालिका निवडणुकीत प्रथमच मिळत आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता गृहित धरून पाच वाजता केंद्रावर आलेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे.चौसदस्य प्रभाग रचनेद्वारे कोल्हापूर महानगरापालिकेची प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील मतदानाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रचाराला आता केवळ आठ दिवस उरले असून, एकीकडे उमेदवार, समर्थकांची प्रचाराची धावपळ उडाली असताना दुसरीकडे निवडणुकीची तयारी करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचीही धावपळ उडाली आहे. मतदान आणि मतमोजणी या दोन्ही टप्प्यांवरील तयारी करण्यात यंत्रणेतील सर्व कर्मचारी व्यस्त आहेत. सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.या निवडणुकीत महापालिका हद्दीतील चार लाख ९४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावून ८१ नगरसेवक निवडून देणार आहेत. मतदानासाठी ५९५ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तांत्रिक तपासणी करून शासकीय गोदामात ठेवण्यात आलेली इलेक्ट्रिक मतदान यंत्रे तसेच त्याची कंट्रोल युनिट आज, मंगळवारी सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येत आहेत. त्यांच्या कार्यालयाकडून ती दि. १४ जानेवारी रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक यंत्रणेसह पाठविण्यात येणार आहेत.आज कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षणनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ५९५ मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आज, मंगळवारी आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सकाळी ९ ते दुपारी ११ यावेळेत सायबर कॉलेज आनंद भवन, राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील हॉल, स. म. लोहिया रामगणेश गडकरी सभागृह व राजाराम कॉलेज येथे होणार आहे. तसेच दुपारी २ ते सायंकाळी ४ या सत्रात सायबर कॉलेज आनंद भवन, स. म. लोहिया रामगणेश गडकरी सभागृह व राजाराम कॉलेज येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन, जबाबदाऱ्या व आयोगाच्या सूचनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

तीन हजार मतदान कर्मचारी नियुक्तशहरातील ५९५ मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. प्रत्येक केंद्रावर एक मतदान अधिकारी, तीन मतदान सहायक, एक शिपाई, एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे.

१० जानेवारीला पोस्टल मतदानकोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत सक्रिय सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात आला असून हे मतदान १० व ११ जानेवारीला होणार आहे.कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. या निवडणुकीतील मतदान सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे एक विशिष्ट नमुन्यातील अर्ज भरून द्यायचा आहे. तो भरून दिल्यानंतरच त्यांना मतदान करता येईल.आतापर्यंत ४०० कर्मचाऱ्यांनी असे अर्ज घेतला असून आज मंगळवारी होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरावेळीही फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. १० व ११जानेवारीला ज्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पोस्टल मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. मतदान झाल्यानंतर मतपत्रिका संबंधित कार्यालयात सील करून ठेवल्या जातील आणि त्या मतमोजणीवेळी मोजल्या जातील.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election 2026: Voting for ten hours; four members selected

Web Summary : Kolhapur prepares for its municipal election on January 15th, with ten hours of voting at 595 centers. Voters will elect four representatives for the first time. Training for election staff is underway.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Votingमतदान