शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या योजना, आकडे बदलाचा 'खेळ'; कोल्हापूर मनपाच्या 'बजेट'मध्ये १५०० कोटींचा ताळमेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:35 IST

प्रशासनाकडून स्थायीकडे सादर : सोमवारच्या सभेत मिळणार मंजूरी

कोल्हापूर : मागील अर्थसंकल्पातील बहुतांश जुन्याच योजना, प्रकल्पांचा समावेश असलेले कोल्हापूर महानगरपालिकेचे १४९७ कोटी ४९ लाख रुपयांचे सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी सादर केले. या अंदाजपत्रकात नगरसेवकांच्या सूचनांची नोंद घेऊन ३० मार्चच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह मनपा व पाणीपुरवठा महसुली अपेक्षित जमा रक्कम ७५४ कोटी ७१ लाख रुपये असून खर्च ७५४ कोटी ५४ लाख अपेक्षित आहे. पाणीपुरवठा भांडवली अपेक्षित जमा रक्कम रुपये २६८ कोटी १७ लाख रुपये असून खर्च २६७ कोटी ३ लाख रुपये आहे.विशेष प्रकल्पांतर्गत जमा ४१८ कोटी ६७ लाख रुपये अपेक्षित असून, खर्च ४१८ कोटी ३९ लाख रुपये आहे. वित्त आयोगाअंतर्गत एकूण ५५.९४ कोटी अपेक्षित असून खर्चही तितकाच अपेक्षित आहे. याप्रमाणे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग मिळून एकूण १४९७ कोटी ४९ लाख रुपये इतक्या जमेचे अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आले.

उत्पन्न वाढवण्यावर भर देणारमहानगरपालिका महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर देणार आहे. सन २०२६-२७ साठी घरफाळ्यातून ११०.१७ कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे. कर आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांना मिळकतकर प्रणालीमध्ये घेणे, थकीत फाळा प्रभावीपणे वसूल करण्याचे उद्दिष्ट नवीन आर्थिक वर्षामध्ये ठेवण्यात आले आहे.

मनपाच्या इमारतीसाठी २ कोटीची तरतूदकोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्क येथील जागा राखीव ठेवली आहे. याकामी सविस्तर आराखडा तयार केला असून लोकप्रतिनिधींसाठीच्या स्वतंत्र इमारत विभागात १५० नगरसेवकांसाठी सोय असलेले सभागृह, सर्व स्थायी व इतर समिती व सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यालये प्रस्तावित आहेत. या इमारतीच्या बांधकामासाठी १०३ कोटी १५ लाख रुपये निधीची अवश्यकता आहे. याकामी अनुदानासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. प्राथमिक कामांसाठी मनपा अंदाजपत्रकामध्ये दोन कोटींची तरतूद केली आहे.

महानगरपालिकेमध्ये सुरु असलेले केंद्र-राज्य शासन निधीमधील विविध प्रकल्प व नव्याने मंजूर झालेले प्रकल्प यासाठी महानगरपालिका स्वनिधीमधून मोठ्या प्रमाणावर मनपा हिश्श्याची रक्कम उपलब्ध करुन द्यावी लागत आहे. याचा विचार करुन हे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. - के. मंजुलक्ष्मी, आयुक्त

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Corporation's Budget: Old Schemes, Number Changes, ₹1500 Crore Balance

Web Summary : Kolhapur Municipal Corporation's ₹1497.49 crore budget for 2026-27 focuses on revenue enhancement. Property tax collection, building search, and pending dues recovery are prioritized. ₹2 crore allocated for the new administrative building, with state funding pursued.