कोल्हापूर :दुचाकीस्वारास मारहाण, हातगाडी चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 11:41 IST2018-11-09T11:39:09+5:302018-11-09T11:41:02+5:30

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे हातगाडीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दुचाकीस्वारास शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण केली. धनाजी दिनकर पाटील (वय ५३, रा. विठ्ठल मंदिर, कदमवाडी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी हातगाडी चालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Kolhapur: A motorcycle driver, a motorcycle driver | कोल्हापूर :दुचाकीस्वारास मारहाण, हातगाडी चालकावर गुन्हा

कोल्हापूर :दुचाकीस्वारास मारहाण, हातगाडी चालकावर गुन्हा

ठळक मुद्देदुचाकीस्वारास मारहाण, हातगाडी चालकावर गुन्हाशाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक येथे हातगाडीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दुचाकीस्वारास शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण केली. धनाजी दिनकर पाटील (वय ५३, रा. विठ्ठल मंदिर, कदमवाडी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी हातगाडी चालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अधिक माहिती अशी, धनाजी पाटील हे दुचाकीवरून मध्यवर्ती बसस्थानक येथून परीख पुलाकडे निघाले होते. शिल्पा अंडाबुर्जी नावाच्या हातगाडी चालकाचा धक्का दुचाकीला लागला.

पाटील यांनी हातगाडी बघून ढकलत जावा असे म्हणाले. त्यावर त्याने मला तू काय करणार आहेस? ते कर, अशी शिवीगाळ करून हातगाडीमध्ये लपवलेली लोखंडी पाईप बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यामध्ये ते जखमी झाले. पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: A motorcycle driver, a motorcycle driver