कोल्हापूर : मोपेडच्या डिकीतून रोकड लंपास, स्टेशन रोडवरील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:29 IST2019-01-08T15:28:39+5:302019-01-08T15:29:32+5:30

स्टेशन रोडवरील वटेश्वर मंदिर परिसरात पार्किंग केलेल्या मोपेडच्या डिकीतून चोरट्याने ६२ हजाराची रोकड हातोहात लंपास केली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

Kolhapur: From Mokad's Dikkon, on Road Lampas, Station Road type | कोल्हापूर : मोपेडच्या डिकीतून रोकड लंपास, स्टेशन रोडवरील प्रकार

कोल्हापूर : मोपेडच्या डिकीतून रोकड लंपास, स्टेशन रोडवरील प्रकार

ठळक मुद्देमोपेडच्या डिकीतून रोकड लंपास, स्टेशन रोडवरील प्रकारशाहुपूरी पोलीसांत फिर्याद

कोल्हापूर : स्टेशन रोडवरील वटेश्वर मंदिर परिसरात पार्किंग केलेल्या मोपेडच्या डिकीतून चोरट्याने ६२ हजाराची रोकड हातोहात लंपास केली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

अधिक माहिती अशी, सुनिल महादेव चंदवाणी (वय ४०, रा. हरीओम बंगला, कारंडे मळा, कदमवाडी) हे सोमवारी (दि. ७) सकाळी अकराच्या सुमारास मोपेडवरुन बाहेर पडले. यावेळी त्यांनी डिकीमध्ये ६२ हजार रुपये, मोबाईल, पाकिट, चार्जर एका पिशवीत घालून ठेवले.

स्टेशन रोडवरील वटेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी त्यांनी राजीव गांधी पुतळ्या शेजारी मोपेड पार्किंग केली. दर्शन घेवून आलेनंतर डिकीमध्ये ठेवलेला गॉगल्स घेण्यासाठी गेले असता पिशवी गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.
 

 

 

Web Title: Kolhapur: From Mokad's Dikkon, on Road Lampas, Station Road type