सदाभाऊ खोत यांनी ट्रॅक्टरने केली नृसिंहवाडीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 19:48 IST2019-08-05T19:43:52+5:302019-08-05T19:48:03+5:30

कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कुरूंदवाड येथे भेट देवून पुरग्रस्त भागाची पाहणी केली. येणार्‍या आपत्तीला तोंड देण्यासाठी शासन सज्ज आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. 

Kolhapur - Minister of State for Agriculture Sadabhau Khot today reviewed the flood situation in Narsinghwadi and Kurundwad. | सदाभाऊ खोत यांनी ट्रॅक्टरने केली नृसिंहवाडीची पाहणी

सदाभाऊ खोत यांनी ट्रॅक्टरने केली नृसिंहवाडीची पाहणी

ठळक मुद्देसदाभाऊ खोत यांनी ट्रॅक्टरने केली नृसिंहवाडीची पाहणीपूरस्थितीचा आढावा घेतला

कोल्हापूर : कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कुरूंदवाड येथे भेट देवून पुरग्रस्त भागाची पाहणी केली. येणार्‍या आपत्तीला तोंड देण्यासाठी शासन सज्ज आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. 

नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड गावाला पाण्याने वेढल्याचे समजताच स्वतः कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्रॅक्टरने प्रवास करीत  गावाला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

नृसिंहवाडी येथील पाहणीनंतर कोयना धरणामधून होणारा विसर्ग, त्या परिसरात सध्या पडणारा पाऊस याविषयी  सातारा जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून माहिती घेतली. यानंतर स्वत: ट्रॅक्टर चालवत ते कुरूंदवाडकडे गेले. या ठिकाणी त्यांनी पुर परिस्थितीची पाहणी केली. तहसिलदार गजानन गुरव यांच्याकडून  सद्यस्थितीबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. येणार्‍या आपत्तीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना शासनाने केली आहे. पुरग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.  यावेळी आम. उल्हास पाटील, जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. निता माने, तहसिलदार गजानन गुरव, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव

Web Title: Kolhapur - Minister of State for Agriculture Sadabhau Khot today reviewed the flood situation in Narsinghwadi and Kurundwad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.