कोल्हापूर : सावत्र मुलीला चटके : आरोपी विवाहितेच्या आईची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:24 IST2018-06-13T14:24:54+5:302018-06-13T14:24:54+5:30
सावत्र मुलीला मारहाण व चटके दिल्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या विवाहितेच्या आईने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

कोल्हापूर : सावत्र मुलीला चटके : आरोपी विवाहितेच्या आईची आत्महत्या
इचलकरंजी : सावत्र मुलीला मारहाण व चटके दिल्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या विवाहितेच्या आईने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
सरस्वती महादेव पाटील ( वय ५५, रा.रत्नदीप वसाहत, गंगानगर, कोरोची ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची नोंद शहापूर पोलीसात झाली आहे.
प्रेमामध्ये अडथळा होत असल्याच्या कारणावरुन आठ वर्षीय चिमुकलीला जन्मदाता पित्याने आणि तिच्या सावत्र आईने शारिरीक छळ करुन तिला तापविलेल्या उलथनाने चटके दिल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती.
त्याप्रकरणामध्ये आरोपी असलेल्या संबंधीत मुलीची सावत्र आई रेश्मा रमेश जगताप (मुळ रा.हसणे, ता.राधानगरी, सध्या रा.गंगानगर) ही आरोपी आहे. तिची आई सरस्वती महादेव पाटील हिने राहत्या घराच्या आतील खोलीत पहाटेच्चा सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले. त्यानी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेनासाठी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविला आहे.