कोल्हापूर महामॅरेथॉन तिसऱ्या पर्वाचे चंद्रकांत, सपना ठरले ‘सिकंदर ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 08:21 PM2020-01-05T20:21:32+5:302020-01-05T20:22:08+5:30

कोल्हापूर : भल्या पहाटेची गुलाबी थंडी, ढोल-ताशे, लेझीम, पोलीस बँड, मर्दानी खेळ आणि आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, ...

Kolhapur marathon third phase, Chandrakant dreams of 'Alexander' | कोल्हापूर महामॅरेथॉन तिसऱ्या पर्वाचे चंद्रकांत, सपना ठरले ‘सिकंदर ’

कोल्हापूर महामॅरेथॉन तिसऱ्या पर्वाचे चंद्रकांत, सपना ठरले ‘सिकंदर ’

Next
ठळक मुद्दे‘महामॅरेथॉन’चा थरार ठरला कोल्हापूग्करांसाठी संस्मरणीय

कोल्हापूर : भल्या पहाटेची गुलाबी थंडी, ढोल-ताशे, लेझीम, पोलीस बँड, मर्दानी खेळ आणि आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, तीन वर्षांच्या नातवाबरोबरच ८० वर्षांच्या आजी-आजोबांचा गगनचुंबी आत्मविश्वास, तरुण, तरुणी, विद्यार्थी, दिव्यांग धावपटूंचा ओसंडून वाहणाºया उत्साही सहभागाला कोल्हापूरकरांनी पुष्पवृष्टी करून दिलेली दिलखुलास दाद, धावपटूंच्या सोबतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डोळ्यांचे पारणे फेडणारे नीटनेटके नियोजन, अशा जोशपूर्ण वातावरणात रविवारी कोल्हापुरातील पोलीस मैदानावर पार पडलेल्या लोकमत समूह आयोजित महामॅरेथॉनमध्ये खुल्या गटातील २१ कि.मी. महामॅरेथॉन स्पर्धा कोल्हापूरच्याच चंद्रकांत मनवाडकर याने, तर उत्तर प्रदेशची सपना पटेल हिने जिंकली. चंद्रकांतने पुरूषांमध्ये २१ कि.मीचे अंतर १ तास १३ मिनिटे ५६ सेकंदांत पूर्ण केले. सपनाने महिलांमध्ये २१ कि.मी.चे अंतर १ तास ३० मिनिटे ५२ सेकंदांत पूर्ण केले.
सुरुवातीला वॉर्मअप झाल्यानंतर ५.५० वाजता राष्ट्रगीत झाले. सहा वाजता २१ कि.मी.च्या खुल्या गटातील धावपटूंना गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, इंडोकाऊंटचे व्हाईस प्रेसिडेंट शैलेश सरनोबत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, एम.आय.टी. आर्ट अ‍ॅँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी (पुणे)चे कुलसचिव एस. के. माळी, इंडियन आॅयलचे वरिष्ठ व्यवस्थापक निशांत जारोंडे, क्युअर आॅनचे सागर निंगनुरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, लोकमत महामॅरेथॉनच्या हेड रुचिरा दर्डा, ‘लोकमत’ कोल्हापूरचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी ‘फ्लॅग आॅफ ’ केला आणि धावपटू आपल्या ध्येयाकडे चित्याच्या चपळाईने धावले

 

Web Title: Kolhapur marathon third phase, Chandrakant dreams of 'Alexander'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.